महाबळेश्वर नगरपालिकेला चुना : टोल मक्तेदाराकडे 2 कोटी 19 लाख थकीत तरीही पालिकेकडून कारवाई शून्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाचगणी प्रतिनिधी | सादिक सय्यद

महाबळेश्वर नगरपालिकेला मुख्य उत्पन्न असलेल्या प्रदुषण कर व प्रवासी कराचे मक्तेदाराकडुन 2 कोटी 19 लाख 23 हजार 178 रुपये व्याजासहीत थकीत असल्याची माहीती समोर आली आहे. महाबळेश्वर नगरपालिकेने प्रवासीकर व प्रदुषण कर गोळा करण्याचा ठेका खळतकर कन्स्ट्रक्शन्स कंपनीला देण्यात आला होता. महाबळेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी खळतकर कन्स्ट्रक्शन्स कंपनीने करारातील अटी व शर्थीचा भंग केला असल्याची वस्तुस्थिती जिल्हाधिकारी सातारा याच्याकडे मार्गदर्शन मागवण्यात आले आहे.

या पत्रामध्ये खळतकर कन्स्ट्रक्शन्स या मक्तेदार कंपनीने महाबळेश्वर नगरपालिकेच्या टोल मक्तेदारीत व्याजासहीत 2 कोटी 19 लाख 23 हजार 178 रुपये थकीत असल्याचे म्हटले आहे. महाबळेश्वर नगरपालिकीने खळतकर कन्स्ट्रक्शन्स कंपनीकडून ठेका काढून घेवून स्व:ता नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून टोल वसुली सध्य स्थीतीत सुरु आहे. मात्र नगरपालिकेचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान करणाऱ्या ठेकेदारावर कोणतीच कारवाई नसल्यामुळे महाबळेश्वर नगरपालिकेच्या कारभाराबाबत शंकेची पाल दिसु लागली आहे. महाबळेश्वर नगरपालिकेच्या प्रदुषण कर व प्रवासी कर संकलन करण्याचा ठेका खळतकर कन्स्ट्रक्शन्स यांना मिळाला होता. नगरपालीकेकडे अटी व शर्थी नुसार बॅक गॅरटीचे रक्कम 1 कोटी 32 लाख 97 हजार 544 रुपयाची नगरपालिकडे सादर केली नाही. तर नगरपालिकेने खळतकर कन्स्ट्रक्शन्सच्या ठेक्याची अनामत रकमेतून 59 लाख 78 हजार 166 रुपये वसुल केली आहे. मात्र अनामत रक्कम वसुल करुन देखील महाबळेश्वर नगरपालिकेस चालु वर्षातील 26 चेक पोटी 2 कोटी 19 लाख 23 हजार 178 रुपये येणे बाकी आहे. नगरपालीकेने कायदेशीर कारवाई करण्याचे व आर्थिक नुकसान भरपाई करण्यात येणार असल्याचे मक्तेदाराला कळवले आहे.

महाबळेश्नर नगरपालिकेच कारभार नक्की काय सुरु आहे. नगरपालिकेच्या आर्थिक नुकसान करणाऱ्या ठेकेदारा विरोधात कोणतीच कारवाई न करता. फक्त जिल्हाधिकारी सातारा याच्याकडे मार्गदर्शन मागवून कागदी घोडे दामटण्याचा प्रकार महाबळेश्नर नगरपालिकेकडुन सुरु आहे. मक्तेदाराकडून बॅंक गॅरेटी रिनिव्हल न करता मक्तेदारी तत्कालीन मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांनी सुरु कसा ठेवला हा संशोधनाचा विषय आहे. महाबळेश्वरच्या नुतन मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी प्रदुषण कर व प्रवासी कराबाबत मार्गदर्शन जिल्हाधिकारी यांच्याकडे मागितले होते. जिल्हाप्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांनी प्रस्तुत प्रकरणी नगरपरीषद व ठेकेदार यांचेच झालेला करारनामा व कार्यादेश विचारात घेवून प्रलंबित वसुलीबाबत नगरपालिकेने निर्णय घ्यावा असे कळवले आहे.

शिवसेना न्यायालयीन लढा उभारणार : राजेश कुभारदरे

महाळेश्वर नगरपालिकेच्या नगरसेवकांनी गटा-तटाच राजकारण न करता नगरपरीषदेचे आर्थिक नुकसान न होता. मक्तेदार खळतकर कन्स्ट्रक्शन्स यांच्यावर काळ्या यादीत टाकून कायदेशीर कारवाई मक्तेदारावर करुन थकीत रक्कम वसूल करण्यात यावी. अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरुन नगरपालिकेचा आर्थिक नुकसानीचा जाब मागणार आहे. तसेच प्रसंगी शहराच्या हिताकरीता न्यायालयाने लढा उभारणार असल्याचे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व जिल्हा नियोजन सदस्य राजेश कुभारदरे यांनी सांगितले आहे.

Leave a Comment