महाबळेश्वर मधील तो कोरोनाबाधित शहरात आलाच नाही; आरोग्य विभागाने आधीच ताब्यात घेतल्याची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

महाबळेश्वर तालुक्यात कोरोनाने खाते उघडले असून आज महाबळेश्वर येथील रहिवासी असणारा एक तरुण कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. मुंबईहून महाबळेश्वरला येत असलेला २३ वर्षीय तरुण आणि कोरेगाव येथील पुण्याहून आलेला ३६ वर्षीय तरुण अशा दोघांचे कोरोना अहवाल पोझिटिव्ह आले असून ते कोविड वाधित असल्याची माहिती सातारा जिल्हा शल्यचिकीत्सक आमोद गडिकर यांनी दिली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, संबंधित युवक महाबळेश्वर मध्ये येण्या आगोदरच आरोग्य विभागाने त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असल्याची माहिती मिळाली आहे. महाबळेश्वरचा रहिवासी असल्यामुळे त्याची नोंद महाबळेश्वर अशी करण्यात आली आहे. प्रशासनाने आता त्याची नोंद सातारा अशी केली आहे. जिल्हा माहिती अधिकारी यांनी आत्ता माहिती दिली आहे.काल शनिवारी रात्री उशीरा सातारा जिल्ह्यात आणखी दोन नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले. सदर दोन्ही रुग्णांची ट्रेव्हल हिस्टरी असून आता त्यांच्या संपर्कात कोण कोण आले होते याचा पोलिस शोध घेत आहेत. ताज्या आकडेवारीनुसार आता सातारा जिल्ह्यातील एकुण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ११८ वर गेली आहे.

दरम्यान, आत्ता पर्यंत एकही कोरोना रुग्ण न सापडलेल्या महाबळेश्वर तालुक्यात कोरोना विषाणुने शिरकाव केल्याने आता नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. सातारा जिल्हा रेड झोन मध्ये असून कोरोनाला रोखण्याकरता प्रशासनाला काही कठोर पावले उचलणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment