Mahabaleshwar Wilson Point : ‘या’ ठिकाणी सन-सेट नव्हे तर सन-राईज पहायला होते मोठी गर्दी; एकदा नक्की भेट द्या

Mahabaleshwar Wilson Point
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mahabaleshwar Wilson Point) आपल्या देशाला नैसर्गिक साधनसंपत्ती आणि सौंदर्याचा अद्भुत वारसा लाभलेला आहे. त्यामुळे देशभरात अशी अनेक ठिकाणं आहेत जी पाहण्यासाठी पर्यटक हमखास गर्दी करताना दिसतात. त्यात महाराष्ट्रात पाहण्यासारखी आणि फिरण्यासारखी बरीच स्थळं आहेत. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वास्तू, स्वातंत्र्यपूर्व काळातील बांधकाम, निसर्गरम्य ठिकाणे आणि अजून बरंच काही. यामध्ये महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्रातील ‘मिनी काश्मीर’ म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणाची खास बाब म्हणजे इथे लोक सूर्यास्तापेक्षा जास्त सूर्योदय पाहण्यासाठी गर्दी करतात.

महाबळेश्वरचा सन राईज पॉईंट

आजवर तुम्ही अनेक सन सेट पॉईंट्सबद्दल ऐकले असेल. पण महाराष्ट्रातील महाबळेश्वरमध्ये सन राईज पॉईंट आहे. थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण म्हणून महाबळेश्वर ओळखले जाते. इथे फिरायला बरेच पॉईंट्स आहेत. पण इथला सन राईज पॉईंट काहीसा खास आहे. त्यामुळे इथे अनेक पर्यटक मोठ्या संख्येने भेट देताना दिसतात. या पॉईंटला ‘विल्सन पॉईंट’ (Mahabaleshwar Wilson Point) म्हणून ओळखतात. या ठिकाणी एकूण तीन टेहाळणी बुरूज स्थित आहेत. जिथून अतिशय सुंदर अशा निसर्गाचे दर्शन घडते आणि सूर्योदयाचे अप्रतिम दृश्य पहायला मिळते.

विल्सन पॉईंट (Mahabaleshwar Wilson Point)

महाबळेश्वरच्या विल्सन पॉईंटची खासियत म्हणजे इथून दिसणारे सूर्योदयाचे अप्रतिम दृश्य. अत्यंत नेत्रोदीपक आणि डोळ्यात साठवून घ्यावे असे हे दृश्य असते. त्यामुळे विल्सन पॉईंट हे महाबळेश्वरमध्ये फिरायला येणाऱ्या पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण मानले जाते. या हिल स्टेशनवर केवळ महाराष्ट्र नाही तर देशभरातून पर्यटक येत असतात. त्यामुळे सूर्योदयाचे नेत्रसुखद दृश्य पाहण्याचा अनुभव घेण्यासाठी अनेक फॉरेनर्सदेखील येताना दिसतात.

महाबळेश्वरला कसे जाल?

महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यातील एक हिलस्टेशन आहे. जिथे तुम्ही बस, रेल्वे, विमान किंवा स्वतःच्या प्रायव्हेट कारने जाऊ शकता. महाबळेश्वरला जायचे असेल तर तुम्ही साताऱ्यापर्यंत MSRTC बसने जाऊ शकता. तिथून लोकल बसेसच्या माध्यमातून तुम्ही महाबळेश्वर गाठू शकता. याशिवाय जर तुम्ही रेल्वेने जाण्याचा विचार करत असाल तर थोडे त्रासदायक वाटू शकते. (Mahabaleshwar Wilson Point)

महाबळेश्वरचे खुद्द रेल्वे स्थानक नाही. त्यामुळे महाबळेश्वरपासून सुमारे ६० किमी अंतरावर असलेल्या वाठार रेल्वे स्थानकापर्यंत तुम्हाला प्रवास करता येईल. तिथून पुढे तुम्ही लोकल गाड्यांचा वापर करू शकता. तसेच महाबळेश्वरला जाण्यासाठी विमानाने देखील प्रवास करता येईल. यासाठी तुम्हाला पुणे विमानतळपर्यंत येऊन पुढे कॅब किंवा बसने प्रवास करावा लागेल. (Mahabaleshwar Wilson Point) त्यातल्या त्यात मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर भागातील पर्यटकांसाठी स्वतःच्या कारने महाबळेश्वरपर्यंत प्रवास करणे अधिक आनंददायी ठरू शकते.