Sunday, June 4, 2023

‘त्या’ महिला संरपंचाच्या हत्येचं गुढ उलगडलं, 30 वर्षीय तरुण अटकेत; बलात्काराचा गुन्हा…

महाड : हॅलो महाराष्ट्र – महाड तालुक्यातील आदिस्ते गावच्या महिला सरपंचाचा सोमवारी 27 डिसेंबर दुपारी खुन झाला होता. या महिलेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत मृतदेह सापडला होता. हत्या आणि बलात्कार प्रकरणातील आरोपी अमीर शंकर जाधव याला 48 तासामध्ये महाड पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीने पूर्वीच्या भांडणाचा राग मनात ठेवून आरोपीने निर्दयी खून करून तिच्यावर बलात्कार केला आहे. यानंतर पोलिसांनी आरोपीला महाड न्यायालयात हजर केले असता त्याला 4 जानेवारीपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

काय आहे नेमके प्रकरण
आदिस्ते गावच्या सरपंच सोमवारी आपल्या आईसोबत दुपारच्या सुमारास उभटआळी परिसरातील जंगलात लाकडे गोळा करण्यासाठी गेले होते.पीडित महिलेची आई ही काही वेळाने निघून गेल्यानंतर त्या तिथेच लाकडे गोळा करत होत्या. या दरम्यान आरोपीने तिच्या एकटे पणाचा फायदा घेऊन हे कृत्य केले. आरोपीचे आणि पीडितेचे पूर्वी भांडण झाले होते. याचा राग आरोपीच्या मनात होता. पीडितेला जीवे मारण्याच्या हेतून प्रथम तिच्या डोक्यात मागून लाकडी फाट्याने मारहाण केली. त्यानंतर तिला फरफटत नेऊन बांबूच्या बेटात तिच्यावर बलात्कार केला आणि शेवटी तिच्या डोक्यावर दगड मारून ठार मारून घटनास्थळावरून फरार झाला. रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीला हा प्रकार कळल्यानंतर त्याने पोलिसांना याची माहिती दिली.

या हत्येमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेचे अधिवेशनात देखील याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. यामुळे महाड पोलिसांसमोर आरोपीला पकडण्याचे मोठे आव्हान होते. या प्रकरणी महाड तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर महाड तालुका पोलिसांनी तपासाला वेगाने सुरुवात केली. यासाठी त्यांनी डॉग स्कॉड, अंगुली एक्सपर्ट यांची महत्वपुर्ण मदत घेऊन आरोपी अमिर शंकर जाधव उवटआळी आदिस्ते याला पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती महाडचे उप विभागीय पोलिस अधिकारी निलेश तांबे यांनी दिली आहे. आरोपीने आपला गुन्हा मान्य केला असून त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम 376 नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपीला 4 डिसेंबर पर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.