हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या प्रयागराजमध्ये (Prayagraj) महाकुंभमेळा मोठया उत्साहात सुरू आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने (UP Government) कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. तसेच, या सोहळ्याचे ब्रँडिंगही मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. यावरूनच विरोधक योगी सरकारवर जोरदार टीका करत आहेत. अशातच आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी महाकुंभ मेळाव्यातून सरकारला मोठा आर्थिक फायदा झाला असल्याचे म्हणले आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात सांगितले की, “महाकुंभात आतापर्यंत ५० ते ५५ कोटी भाविकांनी स्नान केले आहे. यावेळी देशभरातून आलेल्या भाविकांनी “एक भारत, श्रेष्ठ भारत” चा संदेश दिला. तसेच, कुंभमेळ्याच्या माध्यमातून उत्तर प्रदेशने पर्यटन आणि व्यवसाय क्षेत्रात मोठी उडी ही मारली आहे.”
महाकुंभातून ३ लाख कोटी रुपयांचा फायदा
महत्वाचे म्हणजे, महाकुंभामुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेला सुमारे ३ लाख कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. सरकारने कुंभसाठी १५,००० कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र या भव्य आयोजनामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल झाली आहे. तसेच, हॉटेल्स, वाहतूक, स्थानिक व्यवसाय आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे.
दरम्यान, लखनऊमधील एका उड्डाणपुलाच्या उद्घाटनप्रसंगीही बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, भाविकांसाठी रेल्वे, विमानतळ आणि रस्ते वाहतुकीची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्यामुळे उत्तर प्रदेशातील रस्ते पायाभूत सुविधा अधिक मजबूत झाल्या. असे म्हणत मुख्यमंत्री योगींनी नितीन गडकरी यांचे कौतुक केले.
सध्याच्या स्थितीमध्ये महाकुंभ मेळाव्यासाठी करण्यात आलेल्या खर्चावरून विरोधक सरकारवर जोरदार टीका करत आहेत. मात्र, योगी आदित्यनाथ यांनी हा खर्च राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी असून, त्यामुळे पर्यटन आणि रोजगाराच्या संधी वाढल्या असे म्हणले आहे.
महाकुंभावर मोठ्या प्रमाणावर खर्च आणि त्याच्या ब्रँडिंगवरून विरोधक सरकारवर सतत टीका करत आहेत. मात्र, योगी आदित्यनाथ यांनी हा खर्च राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी असून, त्यामुळे पर्यटन आणि रोजगाराच्या संधी वाढल्या असल्याचा युक्तिवाद केला. तसेच, “महाकुंभाच्या निमित्ताने प्रयागराजचे मोठ्या प्रमाणावर सौंदर्यीकरण करण्यात आले. रस्ते, घाट, मंदिर परिसर आणि पर्यटन स्थळांचा विकास करण्यात आला आहे. यामुळे भविष्यात प्रयागराज हे एक मोठे पर्यटन केंद्र बनेल” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.




