कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
२१ मार्च रोजी सकाळी महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरात पोहचलेल्या प्रवाशांनी आपली वैद्यकीय तपासणी सीपीआरमधून करावी. तसेच पुढील १४ दिवस स्वतःला अलगीकरण करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज केले. कोल्हापूर मंगळवार पेठेतील सापडलेला कोरोना संसर्गित रुग्ण हा पुण्याहून महालक्ष्मी एक्सप्रेसने रात्री निघून तो २१ मार्च रोजी सकाळी ७ वा. कोल्हापुरात पोहचला होता. त्याने जनरल डब्यातून प्रवास केला आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून या दिवशी या रेल्वेने प्रवास केलेल्या प्रवाशांनी आपली वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी. तसेच सर्दी, ताप, खोकला, धाप आदी लक्षणे असल्यास त्वरित सीपीआर रुग्णालयात येवून तपासणी करुन घ्यावी. इतर प्रवाशांना कोणतीही लक्षणे नसली तरीही पुढील १४ दिवसांसाठी कुटुंब किंवा इतर कोणाशीही संपर्क होणार नाही, वस्तुंची देवाण घेवाण होणार नाही, स्वच्छता व अलगीकरणाची सर्व खबरदारी घेवून स्वतः स्वतंत्रपणे अलगीकरणात रहावे, असेही कलशेट्टी यांनी म्हटले आहे.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 79726 30753 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.