आषाढी एकादशीच्या महापूजेचा मान ‘या’ शेतकरी दाम्पत्याला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पंढरपुर । आज आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे मानाचे वारकरी विठ्ठल चव्हाण आणि प्रयागबाई चव्हाण या दाम्पत्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली.

यंदा आषाढी एकादशीच्या महापूजेचा मान वारकरी विठ्ठल मारुती चव्हाण व सौ. प्रयागबाई चव्हाण यांना मिळाला. चव्हाण दाम्पत्य हे सांगवी सुनेवाडी तांडा,ता.अहमदपूर (लातूर) चे रहिवासी असून चव्हाण हे सांगवी सुनेवाडी तांड्याचे १० वर्षे सरपंच होते. गेल्या ३९ वर्षांपासून ते वारी करीत आहेत.

“जनतेच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण व्हाव्यात. बळीराजा आणि महाराष्ट्राचे कल्याण व्हावे आणि पर्जन्यमान चांगले व्हावे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना.”
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Leave a Comment