निष्काळजीपणाचा कळस! गोरखपूरला निघालेली श्रमिक रेल्वेगाडी अचानक पोहोचली ओडिशात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । लॉकडाऊनमुळे विविध राज्यात अडकून पडलेल्या आणि नंतर पायीच घरी जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांचे हाल होऊ लागल्याने अखेर त्यांना मूळ गावी जाता यावे म्हणून काही विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. मात्र, अशीच एक मजुरांना घेऊन जाणारी महाराष्ट्रातून निघालेली रेल्वे उत्तर प्रदेशात जाण्याऐवजी ओडिशाला पोहोचली आणि एकच गोंधळ झाला. दरम्यान आता ही रेल्वे पुन्हा गोरखपूरला रवना करण्यात आली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, काल गुरुवारी महाराष्ट्रातील वसई रोड स्थानकावरून उत्तर प्रदेशमधील गोरखपूर या ठिकाणी जाण्यासाठी एक श्रमिक रेल्वे निघाली होती. परंतु ती रेल्वे उत्तर प्रदेशात पोहोचण्याऐवजी ७५० किलोमीटर दूर अचानक ओडिशामध्ये पोहोचली. तोपर्यंत रेल्वे मोटरमनला काहीही समजले नाही. या प्रकारामुळे प्रवाशांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यानंतर घाईगडबडीत रेल्वे गोरखपूरकडे रवाना करण्यात आली.

आपला नियोजित मार्ग सोडून ही रेल्वे दुसरीकडे गेलीच कशी असे प्रश्न रेल्वे प्रशासनाला विचारले जात असताना त्यावर आता रेल्वे प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ही रेल्वे आपला मार्ग सोडून अन्य ठिकाणी गेली नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आम्ही याबाबत एक चाचपणी केली आणि तो एक नियोजनाचा भाग होता, असे रेल्वे कडून सांगण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”