दिल्लीत आंदोलनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील शेतकरी महिलेचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । मोदी सरकाराच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत हाड गोठवणारी पडत असून यामुळेच या महिलेचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. सीताबाई रामदास तडवी (५६) असं या महिलेचं नाव असून त्या नंदुरबार जिल्ह्यातल्या अंबाबरी गावच्या आहेत. दिल्लीतल्या शहाजनपूर सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनात त्या सहभागी होत्या.

मोदी सरकारने मंजूर केलेले नवे तीन कृषी कायदे तात्काळ रद्द करावेत या मागणीसाठी गेल्या ६३दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरु आहे. दिल्लीतील कडाक्याच्या थंडीतही शेतकरी अद्याप आंदोलनावर ठाम आहेत. याच दरम्यान आंदोलनात सहभागी झालेल्या सीताबाई रामदास तडवी यांचा थंडीमुळे मृत्यू झाला आहे. सीताबाई तडवी यांचं पार्थिव दिल्लीहून नंदुरबारला त्यांच्या मूळ गावी आणण्यात येणार आहे. तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

दिल्लीत सध्या रक्त गोठवणारी थंडी पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्ली गारठली आहे. गुरुवारी सकाळी दिल्लीत 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तसेच, हवामान विभागाने येत्या दो-तीन दिवसांपर्यंत अशीच थंडी असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.