राज्यातील कंटेन्मेंट झोनबाबत राजेश टोपेंनी केंद्राला केली ‘ही’ मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । महाराष्ट्रातील ४ हजार कंटेन्मेंट झोनमध्ये अंदाजे १ कोटी लोक अडकून आहेत. शिवाय यामुळे गस्तीवर असलेल्या पोलिसांवर मोठा भार पडत आहे. प्रशासन आणि पोलिसांवरील भार कमी करण्यासाठी कंटेन्मेंट झोनचा कालावधी १४ दिवसांवर आणावा, अशी मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे. राज्यचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही मागणी केली. राज्यामध्ये कोरोनाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी काल केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याचे आरोग्यमंत्री टोपे, प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल तसेच काही जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांशी संवाद साधला यावेळी त्यांनी कंटेन्मेंट झोनबाबत केंद्राकडे ही मागणी केली.

कंटेनमेंट झोनमध्ये शेवटचा रुग्ण आढळल्यानंतर त्या भागातील व्यवहार २८ दिवस बंद ठेवले जातात. बंद काटेकोरपणे पाळला जाण्यासाठी पोलिस तैनात. मात्र, पोलिसांना आराम मिळावा, त्याचा वापर अन्यत्र होण्यासाठी कंटेन्मेंट झोनचा कालावधी २८ दिवसांवरून १४ दिवस करण्यात यावा अशी मागणी राजेश टोपेंनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना केली. याचबरोबर मुंबईमध्ये आरोग्य कर्मचारी, पोलीस, महापालिका कर्मचारी, खासगी रुग्णालयातील कर्मचारी तसेच शासकीय अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वे सेवा (लोकल सेवा) सुरू करण्याची मागणीही राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे यावेळी केली.

सरकारच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील ४ हजार कंटेन्मेंट झोनमध्ये एक कोटी लोकसंख्या अडकून आहे. एकट्या मुंबईतच ७९८ कंटेन्मेंट झोन आहेत, ज्यात ४२ लाख लोक अडकून आहेत. केंद्राच्या नियमावलीनुसार एखादा भाग कंटेन्मेंट झोन जाहीर केल्यास २८ दिवस कडक निर्बंध पाळावे लागतात.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कोणताही फ्लॅट, घर किंवा इमारत कंटेन्मेंट झोन जाहीर केला जातो, तेव्हा तो भाग करोनाबाधित रुग्णांच्या संख्येवर आधारित १४ दिवसांसाठी प्रतिबंधित भाग असतो. पण एखादी चाळ किंवा झोपडपट्टी असा उच्च लोकसंख्या घनतेचा मोठा भाग प्रतिबंधित केला जातो, तेव्हा त्याला कंटेन्मेंट झोन म्हणतात. या भागात जीवनावश्यक वस्तू वगळता कुणालाही जाण्याची किंवा येण्याची परवानगी नसते आणि २८ दिवसांसाठी हे क्षेत्र प्रतिबंधित असतं.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

 

Leave a Comment