ऐन निवडणुकीत भाजपने मनसे उपाध्यक्ष फोडून त्याला दिली उमेदवारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक प्रतिनिधी| राजकरणात कधी काय होईल हे काहिच सांगता येत नाही. कारण उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच अवघे काही तास शिल्लक असतानाच भाजपने मनसेचे उपाध्यक्ष राहुल ढिकले यांना नाशिक पूर्व मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तुम्ही बातमी वाचत असताना त्यांनी उमेदवारी अर्ज देखील भरलेला असेल.

उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शुक्रवारी शेवटचा दिवस असल्याने राजकारणात विद्युत वेगाने हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच कधीकाळी मनसेचा बालेकिल्ला राहिलेल्या नशिकमध्ये भाजपने मनसेचा उपाध्यक्ष फोडून राज ठाकरे यांना निवडणुकीआधीच मोठा धक्का दिला आहे.

राज ठाकरे यांनी सरते शेवटी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेवून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. राज ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ येत्या ९ तारखेला पहिली जाहीर सभा घेणार आहेत. तर मनसेच्या विधानसभा निवडणुकीतील कामगिरीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्यामुळे येत्या २४ तारखेला मनसे निकालातून कशी प्रकट होते हे पाहण्यासारखे राहणार आहे.

Leave a Comment