Thursday, March 23, 2023

निवडणुकीचे बिगुल वाचाताच पवारांचे भावनिक ट्विट ; म्हणाले मला काहीच नको

- Advertisement -

पुणे प्रतिनिधी |  निवडणुकी आयोगाने आज महाराष्ट्राची निवडणूक जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर करताच शरद पवार यांनी ट्विटरवर भावनिक ट्विट केले आहे. या महाराष्ट्राने मला भरभरून दिले आहे. मला आता काहीच नको आहे असे त्या ट्विटमध्ये पवार म्हणाले आहेत.

“या वयात तुम्ही का फिरता असे मला म्हणतात. पण माझे काही वय झालेले नाही. नवी पिढी, शेतकरी, कामगार, भटके, अल्पसंख्याक, महिला, दलित, आदिवासींना पुढे नेण्यासाठी, महाराष्ट्र व देशाला पुढे नेण्याचे आव्हान आपल्यापुढे आहे. त्यासाठी कष्ट करणे गरजेचे आहे. तेच कष्ट मी करतो आहे.” असे शरद पवार आपल्या ट्विट मध्ये म्हणाले आहेत.

- Advertisement -

आपल्या ट्विट मध्ये त्यांनी आपली भावनिक भूमिका मांडली आहे. त्यात ते म्हणाले आहेत की , . ‘मला आणखी काही नको. महाराष्ट्राने मला भरभरुन दिले आहे. अखेरच्या श्वासापर्यंत अवघ्या महाराष्ट्रासाठी काम करणे हीच माझी इच्छा आहे,’ असे पवारांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. ‘राज्यातील जनतेने मला चार वेळा मुख्यमंत्री केले, देशाचा संरक्षण मंत्री केले, १० वर्षे कृषीमंत्री केले. जनतेने मला भरभरुन दिले आहे. आता मला आणखी काही नको.’ असेही शरद पवारांनी म्हटले आहे.