मोहिते पाटलांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीची जबर खेळी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

माळशिरस प्रतिनिधी |  राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकून रणजितसिंह मोहिते पाटील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेले. त्यानंतर त्यांच्या पक्षांतराला शरद पवार नेमके काय उत्तर देणार याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले होते. अशातच कधी काळी मोहिते पाटलांचे कट्टर वैरी असणारे उत्तरराव जानकर यांना राष्ट्रवादीत घेऊन शरद पवार यांनी त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली आहे.

उत्तमराव जानकर यांनी २००९ ची निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांचा मोहिते पाटील गटाच्या हनुमंत डोळस यांनी पराभव केला होता. या निवडणुकीनंतर लगेचच हनुमंत डोळस यांनीउत्तमराव जानकर यांच्या अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्रावर आक्षेप घेऊन त्यांना न्यायालयात खेचले. त्यानंतर २०१४ साली झालेल्या निवडणुकीत न्यायालयाच्या आदेशावरून उत्तमराव जानकर यांचा अर्ज बाद करण्यात आला. त्यावेळी ते महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार होते. मात्र उत्तमराव जानकर यांच्या जात प्रमाणपत्रावर न्यायालयाने निकाल देत ते वैध ठरवले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक लढणार आहे.

दरम्यान येत्या एक दोन दिवसात सत्ताधारी पक्षातील नेते न्यायालयात जाऊन उत्तमराव जानकर यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे माळशिरसची जागा भाजपला की आरपीआयला हा नवीनच पेच माळशिरस मतदारसंघात उभा राहिला आहे. या सर्व शक्यतांचा निवडा उद्या अर्थात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवंतीच्या दिवशी होण्याची शक्यता आहे.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि विधानसभेच्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाच्या बातम्या –

आदित्य ठाकरेंच्या बँकेमध्ये १० कोटी रुपयांच्या ठेवी, प्रतिज्ञापत्रातून समोर आली संपत्तीची आकडेवारी

भाजपची तिसरी यादी जाहीर – अबतक १४३; खडसे, तावडे आणि बावनकुळेंवरील माया झाली पातळ

स्वतःच्या उमेदवारीबद्दल एकनाथ खडसेंनी केला मोठा गौप्यस्फोट

खडसेंना राष्ट्रवादीत घेण्याच्या हालचाली वाढल्या; अजित पवारांचा बीड दौरा अचानक रद्द

मनसेच्या नितिन नांदगावकरांचा शिवसेनेत प्रवेश

Leave a Comment