अपक्ष रोहित पवारांचा अर्ज छाननीत बाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कर्जत प्रतिनिधी |कर्जत जामखेड मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पवार यांनी दाखल केलेला अर्ज बाद झाला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित राजेंद्र पवार यांचा डमी म्हणून रोहित पवार या कर्जतचा रहिवाशी असणाऱ्या व्यक्तीने अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. उमेदवारी अर्जाला जोडून देण्यात आलेले प्रतिज्ञा पत्र अपूर्ण असल्याने रोहित पवार यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे.

२२७ कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात २७ उमेदवारी अर्ज आलेत. त्यापैकी १६ उमेदवारीचे अर्ज वैध ठरले आहेत.राम शिंदे भाजप, रोहित पवार राष्ट्रवादी, शंकर भैमुले बसपा, अरुण जाधव वंचित बहुजन आघाडी, नवनाथ पालवे मनसे आदी उमेदवारांचे उमेदवारी वैध ठरले आहेत.

कर्जत जामखेड मतदारसंघात शरद पवारांचे नातू रोहित पवार हे राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढत आहेत. तर विद्यमान आमदार आणि मंत्री राम शिंदे हे भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहेत. राम शिंदे विरुद्ध रोहित पवार हा सामना चुरशीचा होणार असून संपूर्ण महाराष्ट्राचे या लढतीकडे लक्ष लागले आहे.

 

Leave a Comment