Maharashtra Assembly Election | आज दुपारपासूनच आचार संहिता लागू; निवडणुकीच्या तारखाही होणार जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maharashtra Assembly Election | राज्यातील विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत. आणि त्यामुळे सगळ्या राजकीय पक्षांमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी चाललेली दिसत आहे. या विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) आचारसंहिता कधी लागू होणार आहे. याबाबतची उत्सुकता सगळ्याच नागरिकांमध्ये आहे. परंतु केंद्र निवडणुकीची निवडणूक आयोगाचा हा निर्णय असणार आहे. अशातच आता विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिते बाबत एक अत्यंत मोठी बातमी समोर आलेली आहे.

ती म्हणजे विधानसभेच्या निवडणुका आज मंगळवारी म्हणजेच 15 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने दुपारी साडेतीन वाजता एक पत्रकार परिषद देखील बोलवली आहे. आणि त्यानंतरच राज्यात आचारसंहिता लागणार आहे. त्याचप्रमाणे आता महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) तारखा देखील जाहीर केल्या जाणार आहे. यासोबत झारखंड विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा देखील आज जाहीर होणार आहेत.

यावर्षी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election) चांगली चुरस आपल्याला पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये पुन्हा एकदा सरकार कोण चालवेल. याबाबतची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे आज दुपारी तीन वाजल्यानंतर आचारसंहिता लागणार आहे. आणि आता कोणत्या निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत. त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे.