हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या जानेवारी 2024 महिन्यातच आयोध्येत रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला आहे. त्यामुळे रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी राज्यातील अनेक भाविक आयोध्येला जात आहेत. या पार्श्वभूमीवरच राज्य सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आज विधिमंडळात राज्याचे अंतरिम बजेट सादर करताना अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी, श्रीनगर (Shrinagar) आणि आयोध्येत (Ayodhya) महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
आज अजित पवार यांनी राज्याचे अंतरिम बजेट (Budget 2024) सादर केले. यावेळेस त्यांनी राजाच्या हिताला घेऊन अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यावेळी बोलताना, पुढील काळात श्रीनगर आणि आयोध्येत महाराष्ट्र भवन बांधण्यात येणार असून यासाठी 77 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. अजित पवारांनी केलेल्या या घोषणेनंतर विधिमंडळात जय श्रीराम जय घोषणा देण्यात आल्या.
दरम्यान, राज्यातील पर्यटकांना आणि भाविकांना योग्य सोयी सुविधा पुरविण्यासाठी श्रीनगर जम्मू काश्मीर आणि अयोध्या येथे महाराष्ट्र भवन उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी 77 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषीपंप ही योजना सुरू करण्यात येणार, तर वीज उपलब्ध नसलेल्या 37 हजार अंगणवाड्यांना सौरऊर्जा संच दिले जाणार, अशा अनेक घोषणा अजित पवार यांनी केल्या आहेत.