Wednesday, March 29, 2023

काँग्रेसच्या काही मराठा नेत्यांना आरक्षण नकोचं होतं, चंद्रकांत पाटील यांचा आरोप

- Advertisement -

मुंबई । सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणावर स्थगितीचा निर्णय दिल्यापासून विरोधकांनी ठाकरे सरकारवर टीकेची झोड ठेवली आहे. चांगल्या समन्वयानं मराठा आरक्षणाचा हा खटला सर्वोच्च न्यायालयात जिंकता आला असता. पण काँग्रेसच्या काही मराठा नेत्यांना आरक्षण नको होतं. त्यांना मराठा आरक्षणात कमीपणा वाटत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

“मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर मागास समाज होईल अशी काँग्रेसमधल्या काही बड्या नेत्यांची कायमच मानसिकता राहिली आहे. मागास नसलेला समाजाचं स्टेटस आपलं जाईल असं त्यांना वाटतं. त्यामुळेच काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी यामध्ये काहीही केलेलं दिसत नाही,” असं पाटील म्हणाले.

- Advertisement -

“विरोधकांनी यापूर्वी काय केलं हा त्यांच्या संस्कृतीचा प्रश्न आहे. अशा प्रकारे समाजात दुही निर्माण करणं, भांडणं करणं, जाळपोळ करणं ही आमची संस्कृती नाही. परंतु आम्हीही आंदोलन करणार आहोत. ज्या मुलांना शैक्षणिक प्रवेश मिळाला नाही किंवा ज्यांना नोकरी मिळता मिळता राहिली त्यांच्यात आपणहूनच अस्वस्थता निर्णाण होईल. सरकारनं मराठा समाजाला योग्य ती मदत करावी,” असंही ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.