‘बजेट’ महाराष्ट्राचा:’लाल’परीसाठी खुशखबर! १६०० नवीन एसटी बस, बस डेपो विकासासाठी ४०० कोटींची तरतूद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नैतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प सादर झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर केला. राज्यातील जनतेला या अर्थसंकल्पाकडून मोठया अपेक्षा असताना एसटी प्रवाशांसाठी मोठी खुशखबर आहे

यंदाच्या राज्य अर्थसंकल्पात सरकार एसटीसाठी नव्या बसेस विकत घेण्यासाठी तसेच बस डेपो विकसित करण्यासाठी ४०० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जुन्या बस बदलून नव्या बस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. अत्याधुनिक सुविधा असलेल्या वायफाय युक्त एसटी बस ग्रामीण भागासाठी उपलब्ध करुन देण्याचं नियोजनही राज्य सरकार करत असल्याचं अजित पवार यांनी विधानसभेत सांगितलं.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा. 

Leave a Comment