Wednesday, March 29, 2023

महाविकास बजेट २०२०: राज्यातील भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी शासन घेणार ‘हा’ निर्णय

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नैतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प सादर झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर केला.

राज्यातील राज्यातील भूमिपुत्रांना रोजगाराची संधी देण्याच्या दृष्टीनं अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली. राज्यातील स्थानिकांना रोजगार मिळावेत यासाठी सरकार आग्रही असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. त्यादृष्टीनं राज्यातील ८० टक्के नोकऱ्या या स्थानिकांना देण्यासाठी कायदा करणार असल्याची मोठी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.

- Advertisement -

राज्यातील किमान १० वी उत्तीर्ण झालेल्या तरुण-तरुणींच्या हाताला रोजगार देणं राज्याचं कर्तव्य असून ध्येय, कुषल मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीनं सरकार प्रयत्नशील आहे. यासोबतच राज्यात ‘मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम’ राबवण्यात येणार असल्याची माहितीसुद्धा पवार यांनी दिली. उच्च तंत्रशिक्षणासाठी १३०० कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार आहे. बरोजगारांना रोजगारक्षम बनवणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.