Maharashtra Budget 2025: अजित पवार यांची लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा ! मायक्रोसॉफ्टसोबत AI सुद्धा जोडले जाणार

0
2
ladaki bahin yojana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maharashtra Budget 2025: महाराष्ट्रासाठीचा अर्थसंकल्प सोमवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. अजित पवार यांनी महिला, कृषी, जेष्ठ नागरिक यांच्यासाठी तरतुदी असणारा अर्थसंकल्प सादर केला. महत्त्वाची म्हणजे लाडक्या बहिणींच्या संदर्भात देखील अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात (Maharashtra Budget 2025) एक मोठी घोषणा केली आहे. चला जाणून घेऊया

सर्वांसाठी घरे (Maharashtra Budget 2025)

अजित पवार यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकार लवकरच ‘सर्वांसाठी घरे’ योजनेतून नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करणार आहे. या धोरणाचे मुख्य उद्दीष्ट येत्या पाच वर्षांत प्रत्येक कुटुंबाला घर मिळवून देणे आहे.

मायक्रोसॉफ्टसोबत AI प्रशिक्षणासाठी करार

महिलांसाठी आणखी एक मोठा उपक्रम म्हणजे टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टसोबत राज्य सरकार (Maharashtra Budget 2025) करार करणार आहे. या कराराद्वारे राज्यातील हजारो महिलांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यावर प्रशिक्षण दिले जाईल, ज्यामुळे महिलांच्या करिअरला नवीन दिशा मिळेल. मुलींच्या व्यावसायिक शिक्षणासाठी 100% शालेय आणि परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत, ज्यांच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये पेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थिनींना हा लाभ मिळेल.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील वाढ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजने अंतर्गत, 2024 च्या जुलैपासून सुमारे 2 कोटी 53 लाख महिलांना आर्थिक लाभ दिले जाणार आहेत. यासाठी 33 हजार 232 कोटी रुपये खर्च होणार असून, 2025-26 मध्ये या योजनेसाठी 36 हजार कोटी रुपयांचा निधी (Maharashtra Budget 2025) प्रस्तावित करण्यात आला आहे.

दीनदयाल अंत्योदय योजना – लखपती दिदी” संकल्प

राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत 22 लाख महिलांना ‘लखपती दिदी’ म्हणून मान्यता मिळाली आहे. 2025-26 मध्ये आणखी 24 लाख महिलांना ‘लखपती’ करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.

दुसरीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत 2100 रुपये कधी मिळणार? त्याची विचारणा (Maharashtra Budget 2025) काही सदस्यांनी केली. त्यावर अजित पवार यांनी अर्थसंकल्प होऊ द्या, असे उत्तर दिले. त्यामुळे अद्यापतरी राज्यातील लाडक्या बहिणींना आहे त्या निधीवरच समाधान मानावे लागेल.