राज्यात आगामी विधानसभा निवडणुकाकीचे वारे वाहू लागले आहेत. अशातच राज्यातील सर्व पक्षांच्या राजकीय हालचालींनी चांगलाच वेग पकडला आहे. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांच्या वेतनामध्ये दुपटीने वाढ करण्यात आली आहे. तसेच कुणबीच्या तीन पोट जातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. हे आणि असे विविध खात्यांचे 24 महत्वपूर्ण निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आले आहेत चला तर मग जाणून घेऊया.
मंत्रिमंडळाचे 24 निर्णय
- सामान्य प्रशासन : सामान्य प्रशासन विभागा अंतर्गत लोहगाव विमानतळाचे नाव जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे
- .महिला व बाल विकास : महिला व बाल विकास विभागासाठी बालगृहे निरीक्षणगृहातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना : शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी
- अन्न नागरी पुरवठा : अन्न नागरी पुरवठा विभागाअंतर्गत .धान उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. आता प्रतिक्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर
- इतर मागास बहुजन कल्याण : कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश
- विधी व न्याय : जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय
- सार्वजनिक बांधकाम : शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग. 1486 कोटीचा प्रकल्प
- वित्त : करदात्यांचे हित लक्षात घेऊन जीएसटी अधिनियमात सुधारणा
- वस्त्रोद्योग : यवतमाळ, जळगांव जिल्ह्यातील सूतगिरणींना थकबाकी परतफेडीसाठी हप्ते
- महसूल : क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना सुसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्रेतला भूखंड
- ग्राम विकास : ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद
- ग्राम विकास : राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ (ग्रामविकास)
- सार्वजनिक बांधकाम : मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्रेतील नव्या संकुलाचे बांधकाम राज्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प
- ऊर्जा : हरित हायड्रोजन धोरणात अँकर युनिटची पारदर्शकपणे निवड करणार
- परिवहन : एसटी महामंडळाच्या जमिनी बीओटी तत्वावर विकसित करणार : साठ वर्षाचा भाडेपट्टा करार
- नियोजन : . ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ , राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ
- कौशल्य विकास : राज्यातील 14 आयटीआय संस्थांचे नामकरण
- उच्च व तंत्रशिक्षण : छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील विधी विद्यापीठांना सात कोटी रूपये
- क्रीडा : अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना थेट नियुक्ती देण्याच्या निर्णयात सुधारणा
- जलसंपदा : जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी
- महसूल : श्रीरामपूर तालुक्यातील मौजे हरेगाव येथील शेती महामंडळाच्या जमिनी मुळ मालकांना परत करणार
- दूग्ध व्यवसाय विकास : दूध अनुदान योजना सुरु राहणार. उत्पादकांना गायीच्या दूधासाठी लीटरमागे सात रुपयांचे अनुदान
- सांस्कृतिक कार्य विभाग : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण जाहीर