व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

किराणा दुकान, सुपर मार्केटमध्ये मिळणार वाईन; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राज्य मंत्रिमंडळाची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्याच्या फायद्यासाठी तसेच महसूल वाढविण्यासाठी एक हजार चौरस फुटाच्या किराणा दुकान आणि सुपर मार्केट या ठिकाणी वाईन देण्याच्या निर्णयास मंजुरी देण्यात आली.

दरम्यान, आज किराणा दुकान आणि सुपर मार्केट या ठिकाणी वाईन देण्याच्या निर्णयाबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच दुकानात वाईन ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. याबाबतचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर राज्यातील सुपर मार्केट, किराणा दुकान, बेकरी, डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये वाईन विकता येऊ शकणार आहे.

वाईनच्या खरेदीवर प्रति लिटर 10 रुपये उत्पादन शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत पाच कोटी रुपयांचा महसूल जमा होणार आहे. किती वाईन विकली याचाही रेकॉर्ड सरकारला मिळणार आहे.