कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
उत्तरप्रदेशात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र कराड येथील शामराव पाटील भाजी व फळे मार्केटमध्ये या बंदला काहीसा अल्प प्रतिसाद मिळाल्याचे पहायला मिळाले. या मार्केटमध्ये सकाळी भाजी – फळे याचे व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे कराडमध्ये दिवसभरात प्रतिसाद मिळणार याकडे आता पहाणे आैत्सुक्याचे आहे.
कराड येथील शामराव पाटील भाजी- फळे मार्केटमध्ये नेहमीप्रमाणे व्यवहार सुरू होते. अशावेळी या ठिकाणी काॅंग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेना या महाविकास आघाडीच्या नेत्यापैकी किंवा कार्यकर्ते कोणीही आलेले नव्हते. तसेच शहरात काही व्यवहार सुरू होण्यास सुरू झालेली असून त्याकडे महाविकास आघाडी काय भूमिका घेणार का असा प्रश्न आहे.
शहरातील अनेक दुकानदार, नोकरदार हे नेहमीप्रमाणे आपले काम सुरू करण्याच्या मनस्थितीत आहेत. मात्र महाविकास आघाडी 11 वाजेपर्यंत काय भूमिका घेणार या बंदबाबत याकडे व्यापारी व खासगी प्रवासी वाहतूक दारांचे लक्ष लागून राहिले आहे.