अन.. मुख्यंमत्री उद्धव ठाकरेंनी घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट, केली २० मिनीट चर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यावर कोरोनाचं संकट असताना राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच आज अत्यंत साधेपणाने महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. यंदाचं वर्ष हे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा ६०वा वर्धापनदिन अर्थात ‘हीरक महोत्सवी महाराष्ट्र दिन’ मात्र, या मंगल घडीला अमंगल अशा कोरोनानं उत्सवाचं स्वरुप येऊ दिलं नाही. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आणि महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी दोघांमध्ये जवळपास २० मिनिटं चर्चा सुरु होती. याआधी उद्धव ठाकरेंच्या हस्ते मंत्रालय परिसरात ध्वजारोहण करण्यात आलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपालांची भेट राज्यातील राजकीय परिस्थितीच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मागणीनुसार विधान परिषदेच्या ९ रिक्त जागांसाठी लवकरात लवकर निवडणूक घेण्याची विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला केली होती. त्यानंतर राज्यात विधान परिषद निवडणूक घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. ही परवानगी देताना आयोगाने कोरोनाबाबत काळजी घेण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत.

निवडणूक आयोगाने २७ मे च्या आधी निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या विनंतीनंतर निवडणूक आयोगाची शुक्रवारी बैठक पार पडली. यानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे २१ दिवसांनी विधानपरिषद निवडणूक पार पडणार असल्याचं निश्चित झालं आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून महाराष्ट्रात निर्माण झालेला पेच आता संपुष्टात येत असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.

Leave a Comment