‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मोदींना पत्र’ ; केल्या ‘या’ पाच प्रमुख मागण्या…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यासह देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक  कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे कोरोना महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करावे, गरीब व दुर्बल व्यक्तींना लॉकडाऊनच्या काळात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून सानुग्रह अर्थसहाय करण्यास मान्यता मिळावी, ऑक्सिजनची वाहतूक हवाईमार्गे आणण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, आदी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्र पाटवून केली आहे.

या आहेत प्रमुख पाच मागण्या –

१) ऑक्सीजनच्या पुठवण्यावर गंभीर भाष्य
राज्यात कोरोना रुग्ण वाढल्यामुळे ऑक्सीजनचा तुटवडा भासतो आहे. या मुद्द्याकडे ठाकरे यांनी मोदींचे लक्ष वेधले आहे. “राज्यात मोठ्या प्रमाणावर चाचण्या होत असून रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. 30 एप्रिलपर्यंत ही रुग्ण संख्या 11.9 लाखापर्यंत जाऊ शकते असा अंदाज आहे . “आज राज्यात 1200 मेट्रिक टन उत्पादनापेक्षा जास्त ऑक्सिजनची गरज आहे. एप्रिल अखेरीपर्यंत ऑक्सिजनची मागणी दिवसाला 2 हजार मेट्रिक टन इतकी होऊ शकते. देशाच्या पूर्व आणि दक्षिण भागातून स्टील प्रकल्पांतून ऑक्सिजन घेण्यास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. आम्हीसुद्धा स्थानिक आणि आजूबाजूच्या ठिकाणांहून ऑक्सिजन उपलब्ध करीत आहोत. मात्र वेळ वाचविण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत या ऑक्सिजनची वाहतूक इतर मार्गांनी आणि त्यातही प्रामुख्याने हवाईमार्गे आणण्यासाठी तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे,” असेसुद्धा ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

२) औषधांच्या निर्यातदारांना कायमस्वरूपी परवाने द्या
रेमडीसीव्हीरची निर्यात थांबविण्याच्या निर्णय केंद्र सरकारने घेतल्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनी मोदींचे आभार मानले आहेत. “इंडियन पेटंट ऍक्ट 1970 च्या कलम 92 नुसार या औषधांच्या निर्यातदारांना कायमस्वरूपी परवाने द्यावेत. ज्यामुळे ते रेमेडीसीव्हीर औषध स्थानिक बाजारपेठेत विकू शकतील,” अशी मागणी ठाकरे यांनी आपल्या पत्रात केली आहे.

३) गरीब व प्राधान्य गटातील कुटुंबाना अर्थसहाय्य द्यावे
कोविड संसर्ग हा राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत नैसर्गिक आपत्ती म्ह्णून घोषित करावा अशी मागणीदेखील त्यांनी मोदी यांच्याकडे केली आहे. तसेच टाळेबंदीच्या काळात अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गटातील शिधापत्रिका धारकांना प्रति प्रौढव्यक्ती दररोज 100 रुपये आणि मुलांना प्रत्येकी 60 रुपये दररोज असे सानुग्रह अर्थसहाय्य करण्यास राज्य सरकारला परवानगी द्यावी, अशी विनंतीही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे.

४) कर्ज हप्ते न आकारण्याबाबत
अनेक लघु उद्योग, स्टार्ट अप्स, व्यवसाय यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांत बँकांकडून कर्जे घातली आहेत. सध्याच्या परिस्थितीत त्यांची ओढाताण होते आहे. निर्बंधांमुळे त्यांच्यावर आर्थिक ताणदेखील पडत आहे. या गोष्टीचा विचार करुन ठाकरे यांनी वरील उद्योजकांकडून कर्जाचे हफ्ते घेऊ नयेत, असं त्यांनी म्हटलं आहे. “चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत लघू उद्योग, स्टार्ट अप्स, व्यवसायिक यांच्याकडून हप्ते स्वीकारण्यात येऊ नयेत अशा सूचना बँकांना द्याव्यात,” अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी मोदींकडे केली आहे.

५) जीएसटी परताव्याला मुदतवाढ मिळावी

कोव्हिड संसर्गामुळे लहान व्यापारी व उद्योग अडचणीत आहेत त्यामुळे मार्च एप्रिलची जीएसटी परताव्याची मुदत आणखी 3 महिने वाढवून मिळावी, अशी मागणीदेखील मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना केली आहे. तसेच अनेक लघु उद्योग, स्टार्ट अप्स, व्यवसाय यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांत बँकांकडून कर्जे घेतली आहेत. सध्याच्या परिस्थितीत त्यांची ओढाताण होते आहे. निर्बंधांमुळे त्यांच्यावर आर्थिक ताण देखील पडत आहे. हे पाहता चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत त्यांच्याकडून हप्ते स्वीकारण्यात येऊ नयेत अशा सूचना बँकांना द्याव्यात, अशीही मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे.

Leave a Comment