…त्यावर फडणवीसांना एवढ्या मिरच्या झोंबण्याचं कारण काय? नाना पटोलेंचा घणाघाती सवाल

मुंबई । बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमारवरील टीकेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं होतं. त्याला आज नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. अभिनेते अमिताभ बच्चन व अक्षय कुमार यांचे शूटिंग व चित्रपट बंद पाडण्याचा इशारा पटोलेंनी दिला होता. पटोले हे प्रसिद्धीसाठी सेलिब्रिटींना लक्ष्य करत असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यावर फडणवीसांना एवढ्या मिरच्या झोंबण्याचं कारण काय?,’ असा सवाल पटोले यांनी केलाय.

”सत्तापक्ष का नेता ना हुआ तो क्या हुआ, विपक्ष का नेता तो हुआ…” याच नकारात्मक भूमिकेतून माझे मित्र देवेंद्र फडणवीस अलीकडं वक्तव्य करीत असतात. त्यांचं वक्तव्य फारसं मनावर घेण्याचं कारण नाही. पेट्रोल आणि गॅस दरवाढी संदर्भात मी जनतेच्या मनातील असंतोषाला वाचा फोडली आहे. त्यांच्या मनातील भावना व्यक्त केली आहे. मी तसं केलं तर भाजपच्या नेत्यांना एवढ्या मिरच्या झोंबण्याचं कारण काय?,’ असा सवाल पटोले यांनी केला.

अक्षय, अमिताभ यांच्यावर काय म्हणाले होते पटोले..
इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून नाना पटोले यांनी काल अमिताभ बच्चन व अक्षयकुमार यांच्यावर तोफ डागली होती. ‘काँग्रेसप्रणित यूपीएचे सरकार हे लोकशाही मार्गाने चालणारे, संविधानावर चालणारे सरकार होते. त्यामुळंच अमिताभ, अक्षयसह असंख्य सेलिब्रिटी सरकार विरोधात आवाज उठवत होते. आज या मंडळींनी मोदी सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठवणे अपेक्षित असताना ते भाजपाच्या हातचे बाहुले बनले आहेत. भाजपच्या इशाऱ्यावर टिव टिव करणाऱ्या या अभिनेत्यांचे चित्रपट महाराष्ट्रात बंद पाडू, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यावरून फडणवीस यांनी पटोले यांच्यावर टीका केली होती.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.