हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maharashtra Expressways । मागील काही वर्षांपासून आपल्या भारतात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून अनेक रस्त्यांची आणि महामार्गाची निर्मिती झाली आहे. अगदी महाराष्ट्राबाबत सांगायचं झाल्यास, मुंबई ते नागपूर असा समृद्धी एक्सप्रेस वे तयार झाला आहे. उत्तर भारताला मुंबईशी जोडणाऱ्या मुंबई- दिल्ली एक्सप्रेस वेचे कामही प्रगतीपथावर आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यातच आता आणखी एक नवीन प्रकल्प समोर येत आहे ज्याचा फायदा महाराष्ट्राला होणार आहे. सुरत ते चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस वे असं या प्रकल्पाचे नाव असून हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा महामार्ग म्हणून ओळखला जाईल. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांना जोडणारा हा 1,271 किलोमीटर लांबीचा महामार्ग महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांमधून जाणार आहे.
कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश ? Maharashtra Expressways
सुरत ते चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेसवे हा महाराष्ट्रातील नाशिक,अहमदनगर, बीड, धाराशिव आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमधून जाणार आहे. या ५ जिल्ह्यातील तब्बल ३७१ गावांमधून हा नवा एक्सप्रेसवे तयार होत आहे. यामुळे या जिल्ह्यांचा प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार आहे. तसेच या भागातील दळणवळण, व्यापार आणि पर्यटन क्षेत्रात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. हा महामार्ग (Maharashtra Expressways) पूर्ण झाल्यास या गावांना थेट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी जोडले जाईल, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था आणि रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील.
सुरत ते चेन्नई एक्सप्रेसवेचा मुख्य फायदा-
सुरत ते चेन्नई एक्सप्रेसवेची लांबी 1,271 किलोमीटर असून, रुंद १०० मीटर आहे. महामार्ग सहा पदरी (six-lane) असून, भविष्यात तो आठ पदरी करण्याचा विचार आहे. या एक्सप्रेसवे मुळे सुरत आणि चेन्नई आर्थिक सेंटर असलेली शहरे जोडली जातील. सुरतला कापडाची मोठी बाजारपेठ आहेत तर चेन्नईला माहिती तंत्रज्ञान उद्योग आहे. त्यामुळे या एक्सप्रेसवे मुळे उद्योग आणि रोजगाराच्या मोठ्या संधी तयार होतील.सुरत ते चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस वेच्या (Maharashtra Expressways) बांधकामादरम्यान आणि त्यानंतरही अनेक नवीन रोजगार उपलब्ध होतील, ज्यामुळे स्थानिक तरुणांना काम मिळेल. अनेक नव्या उद्योगांना चालना मिळणार असून,स्थानिक लोकांचे जीवनमान नक्कीच सुधारू शकते.