महाराष्ट्रात लॉकडाऊन ३० एप्रिल पर्यंत वाढणार?; मुख्यमंत्र्यांचे संकेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सध्या संपूर्ण देशाला एकाच प्रश्नाची उत्सुकता आहे ती म्हणजे लॉकडाऊन कधी संपणार? कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारनं देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जारी केला. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला २१ दिवसांचा लॉकडाउन १४ एप्रिलला संपत आहे. मात्र अद्यापही देशात परिस्थिती नियंत्रणात आली नसल्याने लॉकडाउन वाढवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत. या बैठकीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवावा अशी सूचना पंप्रधान मोदींना केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन वाढवण्याबाबतची इच्छा मोदींकडे व्यक्त केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यन्त लॉकडाउन वाढणार असल्याची दाट शक्यता आहे.

आजच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. त्यानुसार राज्यातील लॉकडाऊन वाढण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. याचसोबत या काळात केंद्राकडून राज्याला मदतीची गरज असल्याचंही त्यांनी या चर्चेत सांगितलं. लॉकडाउन हटविण्याबाबतचा निर्णय सरसकट संपूर्ण देशासाठी घ्यावा, तो टप्प्याटप्प्याने हटवायला नको अशी सूचना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. अरविंद केजरीवाल यांच्या या सूचनेला उद्धव ठाकरेंसोबत इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पाठिंबा दिला. त्यामुळं केंद्राच्या टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन हटविण्याच्या निर्णयाला राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी विरोध दर्शविला आहे. दरम्यान, ओडिशा आणि पंजाब यांनी आधीच लॉकडाऊनची मुदत वाढवली आहे. ओडिशाने ३० एप्रिल तर पंजाबने १ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे.

घाईत लॉकडाऊन हटवल्यास घातक परिणाम WHO 
WHOचे प्रमुख टेड्रोस एडहानोम यांनी जिनिवामधील पत्रकार परिषदेत म्हटलं की, “लॉकडाऊन हटवावं अशी सगळ्यांसारखीच आमचीही इच्छा आहे. परंतु घाईने लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेतला तर कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होती. जर आपण योग्य पद्धतीने कोरोना व्हायरसचा सामना केला नाही तर त्याचे घातक परिणाम होतील.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

या बातम्याही वाचा –

ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा – www.hellomaharashtra.in