पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना 596 कोटी रुपयांची मदत जाहीर; कोणत्या विभागाला किती मदत मिळणार ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मागील वर्षी राज्यात अवकाळी पाऊस झाला. आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. परंतु नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिलेला आहे. ती म्हणजे आता या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून 586 कोटी रुपयांची मदत देखील केली जाणार आहे. परंतु आता कोणत्या विभागात किती नुकसान झालेले आहे? आणि शेतकऱ्यांना किती मदत मिळणार आहे? याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

शेतकऱ्यांना चहूबाजूने नेहमी संकटांचा सामना करावा लागतो. कधी नैसर्गिक आपत्ती येते, तर कधी चांगले पीक असतानाही बाजारात त्याला चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी नेहमी चिंतेत असतो. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी होते आणि याचा फटका शेतकऱ्यांच्या पिकाला बसतो आणि पर्यायाने त्यांचे पीक वाया जाते. यावर्षी पावसाचा जोर देखील चांगलाच पाहायला मिळाला होता. आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसला. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने जवळपास 596 कोटी रुपयांची मदत जाहीर केलेली आहे.

कोणत्या विभागात किती मदत मिळणार ?

नाशिक भागामध्ये जवळपास 37 हजार 482 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. यातील 73 हजार 567 शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना आता सरकारकडून जवळपास 108 कोटी २१ लाख रुपयांचे आर्थिक मदत केली जाणार आहे.

त्याचप्रमाणे अमरावती विभागातील शेतकऱ्यांसाठी 382 कोटी रुपयांची मदत सरकारने जाहीर केलेली आहे. अमरावती विभागातील 21 हजार 362 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते. यामध्ये जवळपास 1 लाख 38 हजार 253 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले होते.

नागपूर विभागात जवळपास 3 लाख 54 हजार 756 शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांची जवळपास 2 लाख 37 हजार 790 हेक्टर वरील पिकांना फटका बसला होता या विभागासाठी सरकारने जवळपास 100 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केलेली आहे.

पुणे विभागात 2297 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. या शेतकऱ्यांचे 1757 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले होते या शेतकऱ्यांसाठी सरकारने 5 कोटी 83 लाख रुपयांची मदत जाहीर केलेली आहे. तसेच नागपूर आणि अमरावती विभागातील शेतकऱ्यांना 482 कोटी रुपयांची मदत जाहीर झालेली आहे.