कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
अहिंसा यात्रेचे प्रणेते श्वेतांबर तेरापंथ सभेचे आचार्यश्री महाश्रमन यांचे आज कोल्हापूरात आगमन झाले. आचार्यश्री महाश्रमन यांची देशव्यापी यात्रा सुरू आहे. तीन देश आणि 20 राज्यांमधून पदयात्रा करत ही यात्रा आज कोल्हापुरात पोहोचली. आचार्यश्री महाश्रमन यांच्या राज्यस्तरीय अभिनंदनाचा सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उपस्थित होते.
दरम्यान, आचार्यश्री महाश्रमन यांच्या बद्दल आदर व्यक्त करत आणि सर्व प्रोटोकॉल बाजूला सारून राज्यपाल चक्क व्यासपीठावर मांडी घालून बसले. एका बाजूला राष्ट्रपती दोषारी व्यासपीठावर मांडी घालून बसले असताना दुसऱ्या बाजूला महापौर निलोफर आजरेकर देखील व्यासपीठावर बसल्याचे अनोखा चित्र या निमित्ताने पहायला मिळालं.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.