Maharashtra Government | महाराष्ट्रातील महिलांसाठी नोकरीची संधी, ‘या’ पदासाठी निघाल्या तब्बल 14,690 जागा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maharashtra Government | महाराष्ट्र सरकार हे महिलांसाठी अनेक नवनवीन योजना आणत असतात. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना, आता सरकार महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना आणत आहेत. महाराष्ट्राची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची (Maharashtra Government) सध्या राज्यभर चर्चा चालू आहे. अशातच आता महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी देखील महाराष्ट्रातील महिलांना नोकरीची एक सुवर्णसंधी दिलेली आहे.

आदित्य तटकरे यांनी अंगणवाडी मदतनीस यांच्या भरतीची एक मोठी घोषणा जाहीर केलेली आहे. या भरतीच्या अर्ज करण्याची प्रक्रिया देखील चालू झालेली आहे. 31 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदर लवकरात लवकर अर्ज करा.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी मदतनीस यांची तब्बल 14690 रिक्त पदे आहेत. ती रक्त पदे भरण्यासाठी आता अधिसूचना निघालेली आहे. याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे इच्छुक महिलांनी अर्ज करावा असे देखील आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

नुकतेच काही दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी (Maharashtra Government) लाडकी बहिनी योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे राज्य सरकारकडून थेट महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. परंतु ज्या महिलांचे बँकेमध्ये खाते नाही त्यांना अडचणी येत आहे. त्यामुळे ज्या महिलांची बँकेमध्ये खाती नाही. त्यांना खाती खोलून देण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे, असे देखील सांगण्यात आलेले आहे.