Wednesday, March 29, 2023

साहित्यिक द.ता.भोसले यांच्या पुस्तकास राज्य शासनाचा पुरस्कार

- Advertisement -

सोलापूर प्रतिनिधी । ग्रामीण साहित्यिक द.ता.भोसले यांच्या “संवाद बळीराजाशी” या ‘सकाळ’ प्रकासनाच्या पुस्तकास राज्य शासनाचा वसंतराव नाईक पुरस्कार जाहीर झाला आहे. १ लाख रूपये रोख असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. भोसले यांना यापूर्वी राज्य शासनाचे सहा पुरस्कार मिळाले आहेत. भोसले यांनी अँग्रोवन मधून लेखन केले आहे. हा पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे अनेक स्थरातून अभिनंदन केलं जात आहे.

मराठी साहित्यात १९६० च्या आसपास दलित आणि ग्रामीण साहित्याचा उदय झाला. अनेक नवे लेखक लिहिते झाले. त्यातील एक नांव म्हणजे डॉ. द.ता. भोसले. त्यांनी कथा, कादंबरी, समीक्षा, ललित असे विपुल लेखन केले. त्यांच्या काही कथा ‘द. ता. भोसले यांच्या निवडक कथा’मध्ये संकलित झाल्या आहेत. ग्रामीण जीवन, शेतकरी, शेत, शेतमजूर, तेथील संस्कृती, ताणतणाव आदी विविध समस्या, माणसाची भूक, दारिद्र्‍य हे त्यांच्या ‘वावटळ’ ‘नाथा वामण’, ‘अन्न’ अशा विविध कथांमधून दिसते.

- Advertisement -

शहरातील बकालपणावरही त्यांनी लिहिले आहे. त्यांच्या लिखाणात विनोदाचा शिडकावाही असतो. अशा प्रकारे समाजजीवनाचे यथार्थ जीवन त्यांच्या कथांमध्ये दिसते. खेड्यांतील मुलामुलींच्या शिक्षणासाठी ते २५ हून अधिक वर्षे भरीव आर्थिक मदत करीत आहेत.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.