BREAKING : आज रात्रीपासून पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता चांगलीच त्रस्त झाली आहे. पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्यक वस्तूचे दर वाढले असताना राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. “राज्यात आता पेट्रोल, डिझेलच्या दरावरील व्हॅट कमी करण्यात आला आहे. आज रात्रीपासूनच याची अंमलबजावणी केली जाईल,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.

BREAKING : आज रात्रीपासून पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी इंधन दर कपातीबाबतचा निर्णय जाहीर केला. राज्यात पेट्रोल 5 रुपये आणि डिझेल 3 रुपये प्रति लिटरने स्वस्त झाले आहे. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर सहा हजार कोटींचा बोझा पडणार आहे.

केंद्र सरकारने एक्साईज ड्युटी कमी केल्यानंतर राज्य सरकारने व्हॅट कमी करावा, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडून राज्याचा थकीत जीएसटी मिळाल्याशिवाय आम्ही हा निर्णय घेणार नाही अशी भूमिका घेतली होती. मात्र आता सत्तेत आल्यानंतर शिंदे – फडणवीस सरकारने पेट्रोल व डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर सहा हजार कोटींचा बोझा पडणार आहे.

Leave a Comment