हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येकजण नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपापल्या घरात कॅलेंडर घेऊन येत असतात. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत यंदा किती सार्वजनिक सुट्ट्या ( Holidays ) आहेत , हे शोधत असतात. यासाठी महाराष्ट्र सरकारने 4 डिसेंबर 2024 रोजी एक अधिसूचना जारी केली असून , 2025 या वर्षासाठी सार्वजनिक सुट्ट्यांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. तसेच या सुट्ट्या 1881 च्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या (Negotiable Instruments Act ) कलम 25 अंतर्गत देण्यात आल्या आहेत. राज्यातील सरकारी कर्मचारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी 24 सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. तर चला जाणून घेऊयात कोणत्या दिवशी या सुट्ट्या मिळतील .
2025 वर्षासाठी सुट्ट्यांची यादी –
26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त सुट्टी असणार असून , या दिवशी रविवार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी , महाशिवरात्री 26 फेब्रुवारी , होळी 14 मार्च , गुढीपाडवा 30 मार्च , रमजान-ईद 31 मार्च , राम नवमी 6 एप्रिल , महावीर जन्मकल्याणक 10 एप्रिल , डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल , गुड फ्रायडे 18 एप्रिल , महाराष्ट्र दिन 1 मे , बुद्ध पौर्णिमा 12 मे , बकरी ईद 7 जून , मोहरम 6 जुलै , स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट , पारसी नववर्ष 15 ऑगस्ट , गणेश चतुर्थी 27 ऑगस्ट , ईद-ए-मिलाद 5 सप्टेंबर , महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर , दसरा 2 ऑक्टोबर , दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन ) 21 ऑक्टोबर , दिवाळी (बलिप्रतिपदा) 22 ऑक्टोबर , गुरु नानक जयंती 5 नोव्हेंबर , ख्रिसमस 25 डिसेंबर बुधवारला साजरा केला जाईल. त्यामुळे या सर्व दिवशी सर्वाना सार्वजनिक सुट्ट्या ( public holidays list 2025 ) असणार आहेत.
सार्वजनिक सुट्ट्यांच्या व्यतिरिक्त एक सुट्टी जास्त –
महाराष्ट्र सरकारने 24 सार्वजनिक सुट्ट्यांच्या व्यतिरिक्त गुरुवार , 23 ऑक्टोबर 2025 रोजी भाऊबीज ही अतिरिक्त सुट्टी म्हणून जाहीर केली आहे. ही सुट्टी राज्यातील सरकारी कार्यालये, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, तसेच महानगरपालिका, नगरपरिषदा, नगर पंचायत, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती यांसारख्या स्थानिक संस्था आणि कार्यालयांसाठी लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे या सर्व संस्थांमध्ये कामकाज थांबवून कर्मचारी आणि नागरिकांना भाऊबीज सण साजरा करण्याची सुवर्णसंधी प्राप्त होईल.