अखेर राज्यपाल स्पाईसजेटच्या विमानाने उत्तराखंडकडे रवाना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । महाराष्ट्र सरकारने सरकारी विमानाने प्रवास करण्याला परवानगी नाकारल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) खासगी विमानाने उत्तराखंडला रवाना झाले. स्पाईसजेट कंपनीच्या विमानाने राज्यपाल कोश्यारी मुंबईहून डेहराडूनला रवाना झाले. राजभवनाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

आज सकाळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सरकारी विमानाने उत्तराखंडला निघाले होते. राज्यपाल कार्यालयाने आठवड्यापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयाकडे परवानगी मागितली होती. राज्यपाल सरकारी विमानाने मसुरीला जाणार होते. मात्र राज्यपालांच्या या प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे.

राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री कार्यालयाने अनुमती दिली नसल्याचं कळलं. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरुन परत राजभवनावर येण्याची नामुष्की ओढावली. दुपारी सव्वाबारा वाजताच्या खासगी विमानाने राज्यपाल कोश्यारी उत्तराखंडला रवाना झाले. दुपारी सव्वा दोन वाजता ते डेहराडूनला पोहोचतील. दरम्यान, या प्रकरणानंतर राज्यात पुन्हा राजकीय वातावरण तापलं आहे.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

 

 

Leave a Comment