Maharashtra Government : झाड तोडल्यास होणार 50 हजारांचा दंड ; मंत्रिमंडळ बैठकीत 12 महत्वपूर्ण निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maharashtra Government : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही उपस्थिती होती. या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 12 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये जलसंपदा विभाग, शेतकरी, आदिवासी आणि वन विभाग यांच्या करिता हे निर्णय घेण्यात आले (Maharashtra Government) आहेत.

मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार आता झाड तोडल्यास एक हजार रुपयांऐवजी 50 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे झाडांची कत्तल करण्याला आळा बसणार आहे . विनापरवाना जंगल तोडणाऱ्यांसाठी (Maharashtra Government) वन विभागाने हे मोठ पाऊल उचलले आहे. आज दिनांक 7 ऑगस्ट रोजी वनविभागाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून जर झाड तोडल्यास 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. या दंडाची तरतूद असणारा शासन निर्णय लवकरच पारित होणार आहे.

अडीच कोटी घरांवर तिरंगा (Maharashtra Government)

दरम्यान भारतीय स्वातंत्र्य दिन म्हणजेच 15 ऑगस्ट पुढच्या आठवड्यात साजरा होणार आहे. त्यासाठी देखील कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबतचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झाला आहे. 9 ऑगस्ट पासून राज्यामध्ये हर घर तिरंग हे अभियान मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्यातल्या अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकवण्यात येणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतले महत्त्वाचे निर्णय (Maharashtra Government)

  • मंत्रिमंडळामध्ये जलसंपदा विभागाअंतर्गत शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन. महत्त्वकांक्षी वैनगंगा -नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता. पावणे चार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार. असे निर्णय घेण्यात आले.
  • गृहनिर्माण विभागांतर्गत आता प्रकल्प बाधितांना सदनिका मिळणार आणि त्याच्या संबंधित धोरणाला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली.
  • नगर विकास विभागाअंतर्गत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये लहान शहरातील पायाभूत सुविधांना वेग येणार आहे. कर्ज उभारण्यास मान्यता देण्यात आली.
  • आदिवासी विकास विभाग अंतर्गत आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
  • तसंच अनुसूचित जाती-जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर होणार आहेत. (Maharashtra Government) या अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आदिवासी विभाग अंतर्गत घेण्यात आला.
  • वनविभाग अंतर्गत विनापरवानगी झाड तोडल्यास आता 50 हजार रुपयांचा दंड होणार आहे. असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.
  • उद्योग विभाग अंतर्गत महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण राबवणार असून पाच वर्षात 30000 कोटींचे उत्पन्न यातून मिळणार असल्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मांडण्यात आलं.
  • वैद्यकीय शिक्षण विभाग अंतर्गत कागल इथं आयुर्वेदिक महाविद्यालय, अजरा तालुक्यातील योग आणि निसर्गोपचार महाविद्यालय बांधण्यात येणार.
  • विधी व न्याय विभाग अंतर्गत न्यायमूर्ती व मुख्य न्यायमूर्तींना सेवानिवृत्तीनंतर घरकाम आणि (Maharashtra Government) वाहनचालक सेवा
  • महसूल विभाग अंतर्गत सेना कल्याण शिक्षण संस्था आणि राधा कल्याणदास दर्यानानी चॅरिटेबल ट्रस्टला मुद्रांक शुल्कात शंभर टक्के सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला.
  • जुन्नरच्या श्री कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक सहकारी संस्थेला अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सहकार विभागांतर्गत घेण्यात आला.
  • नऊ ऑगस्ट पासून राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणात (Maharashtra Government) राबवण्यात येणार असून अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकवण्यात येणार. शिवाय 15 ऑगस्ट निमित्त विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्या बाबतचा निर्णय घेण्यात आला.