ज्येष्ठांना डावलून ‘या’ तरुण चेहर्‍यांना मिळणार मंत्रीपद, पहा संभाव्य मंत्र्यांची यादी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | उद्या 30 डिसेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार बच्चू कडू यांचा समावेश निश्चित मानला जात आहे. शिवसेनेच्या खात्यातून बच्चू कडू यांना मंत्रिपद दिले जाईल. अचलपूर विधानसभा मतदारसंघातून बच्चू कडू सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आलेल्या अदिती तटकरे यांची राज्यमंत्रीपदी वर्णी निश्चित समजली जाते. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेकडून 13, राष्ट्रवादीकडून 13 आणि काँग्रेसकडून 10 अशा 36 आमदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात येणार आहे. विधानभवनाच्या प्रांगणात मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी सुरू आहे.

शरद पवारांकडून आमदारांना फोन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ज्या आमदारांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे अशा आमदारांना स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार फोन करून कल्पना देत आहेत. एकनिष्ठेची फळ, मी जन्मभर तुमचा ऋणी राहिल असे बॅनर ठाणे परिसरात लागले आहेत. यावरून जितेंद्र आव्हाड यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्चित मानला जात आहे. शशिकांत शिंदे यांच्याकडे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
1) अजित पवार
2) दिलीप वळसे पाटील,
3) धनंजय मुंडे
4) नवाब मलिक
5) हसन मुश्रीफ
6) अनिल देशमुख
7) अदिती तटकरे
8) राजेश टोपे
9) राजेंद्र शिंगणे
10) दत्ता भरणे
11) जितेंद्र आव्हाड
12) बाळासाहेब पाटील
13) किरण लहमटे
यांचा समावेश निश्चित मानला जात आहे.

शिवसेना

1) सुनील प्रभू
2) अनिल परब
3) सुनील राऊत
4) तानाजी सावंत
5) डॉ. बालाजी किणीकर
6) उदय सामंत
7) दीपक केसरकर
8) भास्कर जाधव किंवा वैभव नाईक
9) आशिष जैस्वाल किंवा संजय रायमुलकर
10) बच्चू कडू
11) संजय राठोड
12)गुलाबराव पाटील
13) दादा भुसे
14) शंभूराजे देसाई

काँग्रेस
1) के. सी. पाडवी
2) अशोक चव्हाण
3) अमित देशमुख
4) विश्वजित कदम
5) प्रणिती शिंदे
6) सतेज पाटील
7) विजय वड्डेटीवार
8) यशोमती ठाकूर
9) अमिन पटेल
10) वर्षा गायकवाड

Leave a Comment