Sunday, February 5, 2023

महिला पोलिस कर्मचाऱ्यांचे काम 12 वरून 8 तास करणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील ठाकरे सरकारने महिला पोलिसांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील महिला पोलिसांच्या कामाचे तास 12 वरून 8 करण्यात येणार आहे. राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. त्यामुळे महिला पोलिसांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

12 तास काम करणं खरं तर महिला पोलिसांसाठी सोप्पी गोष्ट नाही. घरातील कामे, कौटुंबिक जबाबदारी यामुळे 12 तास ड्युटी करताना महिला पोलिसांची तारेवरची कसरत व्हायची. परंतु आता राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महिला पोलिसांना दिलासा मिळाला आहे.

 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. महाराष्ट्र सरकारने महिला पोलिसांची ड्युटी बारा तासांहून आठ तासांची करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अतिशय चांगला निर्णय असून यामुळे अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांना कुटुंब आणि नोकरी यामध्ये उत्तम असा ताळमेळ साधता येणे शक्य होणार आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह संपूर्ण मंत्रीमंडळाचे मनापासून आभार’, असे ट्वीट खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.