दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : मेळघाट वनक्षेत्राचे माजी प्रादेशिक संचालक एमएस रेड्डी निलंबित 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती : काही दिवसांपूर्वी मेळघाटच्या हरिसाल येथील वनक्षेत्राच्या वनाधिकारी दीपाली चव्हाण यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यांचे वरिष्ठ विनोद शिवकुमार यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आपले जीवन संपविले होते. यापार्श्वभुमीवर मेळघाट वनक्षेत्राचे माजी प्रादेशिक संचालक एमएस रेड्डी यांना शासनाने निलंबित केले असल्याची माहिती समोर आली आहे.

दीपाली चव्हाण यांनी मृत्यूआधी एक पत्र लिहिले होते. त्यामध्ये त्यांनी विनोद शिवकुमार याच्या कृत्याचा पाढा लिहिला होता. त्यांनी अनेकदा मेळघाट वनक्षेत्राचे प्रादेशिक संचालक एमएस रेड्डी यांच्याकडे तक्रार करूनही त्यांनी कारवाई केली नाही असेही या पत्रात लिहिले होते. यानंतर आता रेड्डी यांच्यावर राज्य सरकारने कारवाई केली आहे.

दरम्यान, दीपाली चव्हाण यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईंनी  विनोद शिवकुमार ला फाशी द्या अन्यथा मला फासावर लटकवा अशी मागणी करत पोलीस कार्यालयासोर ठिय्या मांडला होता. विनोद शिवकुमार हे दीपाली चव्हाण याना गावकऱ्यांसमोर शिवीगाळ करत, रात्री -अपरात्री भेटायला बोलवत अगदी गरोदर असतानाही त्यांनी चव्हाण यांना ट्रेकला पाठविले होते ज्यामुळे त्यांचा गर्भपात झाला होता अशा अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

Leave a Comment