अब बात दिल्ली तक जायेंगी! कंगना-शिवसेना वादात राज्यपालांनी घेतली उडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अभिनेत्री कंगना राणावत व शिवसेनेतील वादात आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही उडी घेतली आहे. मुंबई महापालिकेनं कंगनाच्या मुंबईतील कार्यालयातील बेकायदा बांधकाम पाडण्याची कारवाई केली. महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयावर घाईघाईनं केलेल्या कारवाईला राज्यपालांनी आक्षेप घेतला आहे. हे प्रकरण चुकीच्या पद्धतीनं हाताळण्यात आल्याचं राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना कळवलं आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांना तातडीनं राजभवनात बोलावून राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयावर केलेली कारवाई योग्य नव्हती. कंगनानं राज्य सरकारविरोधात वक्तव्य केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिच्याविरोधात कारवाई करण्यात आली, असं राज्यपालांनी म्हटलं आहे. राज्यपाल कोश्यारी याबाबतचा अहवाल केंद्र सरकारला पाठवण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारची सूत्रे स्वीकारल्यापासून राज्यपाल व ठाकरे यांच्यात अनेकदा असे वाद होत आले आहेत. उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नामनिर्देशित सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती करण्याचा निर्णय राज्यपालांनी अनेक दिवस रखडवला होता. पंतप्रधान मोदी यांनी हस्तक्षेप केल्यानंतर तो वाद मिटला. त्यानंतर विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यावरून मुख्यमंत्री व राज्यपाल आमनेसामने आले होते. अलीकडे विधान परिषदेवरील १२ सदस्यांच्या नियुक्तीवरूनही सरकार व राज्यपालांमध्ये मतभेद झाले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment