कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने उचलले ‘हे’ महत्वाचं पाऊल

मुंबई । महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे. शासनाने ऑक्सिजन उत्पादकांना वैद्यकीय वापरासाठी ८०% ऑक्सिजन पुरवठा करण्याचे आदेश जारी केले आहेत.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक रुग्णालयात कोरोना रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा मिळत न्हवता. कोविडच्या वाढत्या घटनांमुळे शासनाने ऑक्सिजन उत्पादकांना वैद्यकीय वापरासाठी ८०% ऑक्सिजन पुरवठा करण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच उर्वरित २०% ऑक्सिजन इतर औद्योगिक कारणांसाठी उपलब्ध असतील असं शासनातर्फे नमूद करण्यात आले आहे. 30 जूनपर्यंत हा आदेश लागू राहील अशी माहिती महाराष्ट्र आरोग्य विभागने दिली आहे.

दरम्यान, दरम्यान, सध्या राज्यात अनेक ठिकाणी बेड मिळत नसल्याची तक्रार ऐकायला मिळते. रुग्ण वाढीचा ताण आरोग्य यंत्रणांवर असून बेड मिळत नाही ही वस्तुस्थिती असल्याचं राजेश टोपे यांनी मान्य केलं. ऑक्सिजन आणि बेड संख्या पाहून लॉकडाऊनचा निर्णय होईल. तसंच ऑक्सिजन निर्मितीचं प्रमाण वाढवण्याचा निर्णय घेतला असून घरी विलगीकरण शक्य नसलेल्यांनी रुग्णालयात जावं असं आवाहन राजेश टोपेंनी केले आहे. सर्व रुग्णालयांना बेड वाढवण्याच्या सूचना दिल्या असल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

You might also like