अशोक चव्हाणांना शिवसेनेचा जोरदार धक्का; मतदारसंघातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीवर भगवा

नांदेड । काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांना शिवसेनेनं जोरदार धक्का दिला आहे. भोकर मतदारसंघातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या बारडमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला आहे. बारडमध्ये १७ पैकी १६ जागा जिंकत शिवसेनेचं दणदणीत विजय मिळवला आहे. शिवसेनेनं मिळवलेल्या यशामुळे अशोक चव्हाणांना जोरदार धक्का बसला आहे.

बारडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे १७ पैकी १६ सदस्य विजयी झाले आहेत. बारडमध्ये शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी थेट टक्कर होती. ही लढत शिवसेनेनं एकतर्फी जिंकली. शिवसेनेचे १७ पैकी १६ जागा जिंकत काँग्रेसला धक्का दिला. नांदेडच्या नायगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राजेश पवार यांच्या आलूवडगाव गावात त्यांच्या गटाचा पराभव झाला आहे. पवार यांच्या गटाचे ९ पैकी ३ जणच विजयी झाले आहेत.

आलूवडगावमध्ये याआधी स्थानिक आघाडीची सत्ता होती. आता राजेश पवार गटाला ९ पैकी ३ जागा मिळाल्या आहेत. शिवाजी पवार यांच्या गटानं ६ जागा खिशात घातल्या आहेत. त्यामुळे आममदारांच्या गटाला सत्तेपासून दूर राहावं लागणार आहे. शिवाजी पवार यांच्या गटानं आलूवडगावात सत्ता मिळवली आहे.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like