कराड । प्रतिष्ठेच्या कराड उत्तर मतदारसंघातील (Karad North constituency) पहिला ग्रामपंचायत निकाल लागलाआहे. निगडी गावात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलचा विजय झालाय. 8 विरुद्ध 1 अशा मोठ्या फरकानं बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलने विजय मिळवला आहे. पाटील यांच्या पॅनलपुठे विरोधकांचा सुपडा साफ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे कराड उत्तरमधील निगडी गावात राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे.(Balasaheb Patil’s panel)
तर दुसरीकडे कराड तालुक्यातील पहिला निकाल खुबी या गावचा लागला आहे. खुबी गावात भाजपचे अतुल भोसले यांच्या पॅनले दणदणीत विजय मिळवला आहे. अतुल भोसले यांच्या पॅनलनं विरोधकांचा 9 विरुद्ध 0 अशा मोठ्या फरकानं दारुण पराभव केला आहे.
दरम्यान, राज्यातील 12,711 ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी सुरु आहे. या निवडणुकीतून एकूण 2 लाख 14 हजार उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. ग्रामीण भागाच्या राजकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी ८० टक्के मतदान झाले. एकूण 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. 1523 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’