बीड । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या गटानं परळीमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. परळी तालुक्यातील निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींमध्ये भाजपला दारुण पराभावाला सामोरं जावं लागले आहे. परळी तालुक्यातील 8 पैकी 6 ग्रामपंचायतींवर धनंजय मुंडे यांच्या गटानं विजय मिळवला. परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्या गटानं पुन्हा एकदा वर्चस्व दाखवून दिलं आहे. (Maharashtra gram panchayat election results 2021 Dhananajay Munde supporter win six Gram Panchayat in Parali)
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला आहे. परळी तालुक्यातील 8 पैकी 6 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीनं वर्चस्व मिळवलं आहे. परळी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व धनंजय मुंडे समर्थक कार्यकर्त्यांचा मोठा विजय झाला आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. परळी तालुक्यातील 8 पैकी वंजारवाडी, रेवली, सरफराजपूर, मोहा, गडदेवाडी, वंजारवाडी , लाडझरी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीनं विजय मिळवला आहे.
राष्ट्रवादींनं विजय मिळवलेल्या ग्रामपंचायती
1 वंजारवाडी बिनविरोध
2 रेवली बिनविरोध
3 सरफराजपुर
4 मोहा
- लाडझरी
-
गडदेवाडी
परळी तालुक्यातील रेवली आणि वंजारवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली होती. या दोन्ही ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे गेल्या होत्या. भोपळा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या गटानं विजय मिळवला आहे.
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’