गुजरात व राजस्थानपेक्षा महाराष्ट्राला सर्वाधिक कोरोना लसीचा पुरवठा : देवेंद्र फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन : कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून केंद्र सरकार आणि राज्य यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असताना आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन लसीच्या पुरवठ्या संदर्भातील वस्तुस्थिती माध्यमांसमोर मांडली. तसेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला कोरोना लसीचं प्रमाण कमी का? असा सवाल केंद्राला केला. त्यास राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिउत्तर दिले असून उलट गुजरात व राजस्थानपेक्षा जास्त कोरोना लस हि महाराष्ट्राला दिली असल्याचे ट्विटरद्वारे सांगीतलं आहे.

फडणवीसांनी टोपेंच्या आरोपांना ट्विटद्वारे उत्तर दिले आहे. फडणवीस म्हणाले आहेत कि, केवळ तीन राज्यांनाच 1 कोटीपेक्षा अधिक लस प्राप्त झाल्या आहेत.
त्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान यांचा समावेश आहे. यात गुजरात आणि राजस्थानची लोकसंख्या समान आहे. तर लसींचा पुरवठा हा लोकसंख्येच्या आधारावर नाही, तर त्या-त्या राज्यांच्या लसीकरणातील कामगिरीच्या आधारावर देण्यात आलेला आहे.

 

महाराष्ट्राला 1.06 कोटी लस प्राप्त झाल्या. तसे ट्विट डीजीआयपीआरने 6 एप्रिल रोजी केले आहे. 91 लाख लसी वापरल्या. म्हणजे 15 लाख लस शिल्लक आहेत. मग, आज जाणिवपूर्वक केंद्र बंद करून लसींबाबत चुकीच्या बातम्या पसरविण्याचे कारण काय? असा सवाल फडणवीसांनी विचारला आहे. राज्यातील कोरोना आणि लसीकरण हे महत्त्वाचे प्रश्न आहेतच.परंतू त्यासोबतच सरकारच्या गैरकारभारावर होत असलेली टीका आणि विविध प्रकरणात न्यायालयात निघत असलेले वाभाडे यावरून लक्ष विचलित करण्यासाठी व्हॅक्सिनवर राजकारण कृपया करू नये, ही कळकळीची विनंती फडणवीसांनी ट्विटरद्वारे केली आहे.

 

कोरोनाविरोधातील लढाईत पहिल्या दिवसापासून केंद्र सरकारने सर्व राज्यांना सोबत घेऊन ही लढाई लढली आहे आणि महाराष्ट्राला सर्वाधिक मदत दिली आहे.आजही केंद्र सरकार महाराष्ट्राच्या खांद्याला खांदा लावून सर्व ती मदत करते आहे. राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी डॉ. हर्षवर्धन यांच्याशी चर्चा केली. त्यांना संपूर्ण वस्तुस्थिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी अवगत करत आश्वस्त केले. मी स्वत:ही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी बोललो. त्यांनी आश्वस्त केले, महाराष्ट्राशी भेदभाव होणार नाही आणि कामगिरीच्या आधारावर तत्काळ पुरवठा होईल, असे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले आहे. आज ज्या राज्यांना कोटा दिला आहे, तितक्या लसी पुरवठ्याच्या मार्गात (पाईपलाईनमध्ये) आहेत, तो पुरवठा 9 ते 12 एप्रिल या काळात होईल. यात महाराष्ट्राला पुन्हा अधिकच्या 19 लाख लस मिळणार आहेत, असे फडणवीसांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले आहे.

Leave a Comment