१४ तारखेनंतर काही ठिकाणांहून लॉकडाउन हटू शकतो, पण..- राजेश टोपे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । सध्या राज्यात किंवा देशात सर्वांना एकच प्रश्न पडला आहे. तो म्हणजे येत्या १४ एप्रिलनंतर लॉकडाउन उठणार का? या प्रश्नाचे उत्तर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं आहे. १४ तारखेनंतर काही ठिकाणांहून लॉकडाउन हटवण्यासंदर्भात सरकार विचार करत आहे अशी माहिती टोपे यांनी दिली. मात्र, सरसकट सर्व ठिकाणावरून लॉकडाउन हटविणे केंद्र आणि राज्य सरकारला शक्य नाही आहे. स्वयंशिस्त राखली तर कदाचित १४ एप्रिलनंतर काही भागांमध्ये लॉकडाउन शिथील होऊ शकतं असं टोपे यांनी सांगितलं आहे. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राजेश टोपे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, महाराष्ट्रात एकूण ५३७ पॉझिटिव्ह करोनाग्रस्त आहेत. मात्र ५० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र लॉकडाउन आणि संचारबंदीच्या माध्यमातून आपण काळजी घेत आहोत. ट्रेसिंग करणं हे आता आव्हान आहे. सध्याच्या घडीला ९ लाख लोकांचं ट्रेसिंग केलं आहे. २ हजार ४५५ टीम्स तयार केल्या आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात त्या टीम करत आहेत. २९० विभाग मुंबई प्रतिबंधित करण्यात आले आहेत. या विभागातही लोक काम करत आहेत. नागपूर, पुण्यातही काम करत आहेत. त्यांना सहकार्य करा असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं.

महाराष्ट्रात नवे २ हजार व्हेटिलेटर्स उपलब्ध होत आहेत. २५ लाख ट्रिपल लेअर मास्कही उपलब्ध आहेत. वैद्यकीय साधनं योग्य प्रमाणात आहेत असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. प्रत्येकाने N95 चा आग्रह धरणं योग्य नाही असंही टोपे यांनी स्पष्ट केलं. आरोग्य विभागातील सगळ्या डॉक्टर, कर्मचारी, विविध विभागातले काम करणारे कर्मचारी जसे की पोलीस किंवा इतर सहकारी यांचे मी आभार मानतो. महाराष्ट्राच्या जनतेचेही मी आभार मानतो असंही राजेश टोपे यावेळी म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

Leave a Comment