हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील मान्सून आता शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. त्यानंतर हिवाळ्याला सुरुवात होणार आहे. अनेक लोक जसे पावसाळ्यात फिरायला जातात. तसे हिवाळ्यात देखील ते फिरायला जाण्याचे अनेक प्लॅन करत असतात. जर तुम्हीही हिवाळ्यात कुठेही फिरायला जायचा प्लॅन करत असाल, तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. कारण आज आम्ही तुम्हाला मुंबई आणि पुण्याजवळील एका लोकप्रिय आणि प्रसिद्ध अशा हिल स्टेशनची माहिती देणार आहोत.
दरवर्षी हिवाळ्याच्या सीजनमध्ये अनेक लोक हिल स्टेशनला जात असतात. परंतु जर तुम्ही इतर दिवसांमध्ये पिकनिकचा प्लॅन करत असाल, तर रायगड जिल्ह्यातील माथेरान हे हिल स्टेशन तुमच्यासाठी खूप चांगला पर्याय असणार आहे. माथेरान हे आशिया खंडातील असे एक मात्र हिल स्टेशन आहे, जिथे वाहनांना जाण्यासाठी बंदी आहे. माथेरान हे महाराष्ट्रातील सर्वात फेमस हिल स्टेशन पैकी एक आहे. या ठिकाणी दररोज हजारो नागरिकांची गर्दी पाहायला मिळते.
राज्यातील कन्या कोपऱ्यातून तसेच इतर राज्यातून देखील अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात. माथेरान आपल्या निसर्ग सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. माथेरान हे मुंबई आणि पुणे या दोन मेट्रो शहरांजवळ आहे. हे हिल स्टेशन मुंबई पासून केवळ 90 किलोमीटर अंतरावर आहे. तर पुण्यापासून केवळ 120 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे पुणे आणि मुंबईची माणसे या ठिकाणी अत्यंत सहज पद्धतीने जाऊ शकतात.
या ठिकाणी जाण्यासाठी नेरळ हे सगळ्यात जवळचे रेल्वे स्थानक आहे. माथेरान पासून हे फक्त 9 किलोमीटर अंतरावर आहे परंतु याच्यापुढे गाड्यांना प्रवेश नाही. त्यामुळे तुम्हाला तिथून प्रवास किंवा पायी करावा लागतो. या ठिकाणी घोड्यांची सुविधा देखील उपलब्ध आहे. या ठिकाणी जाण्यासाठी ट्रेन देखील उपलब्ध आहे. तुम्ही ट्रेनमध्ये बसून देखील माथेरानला जाऊ शकतो. टॉय ट्रेनचा प्रवास आणि अनुभव खूप मस्त आणि मजेशीर आहे अनेक लोक हे टॉय ट्रेनने जात असतात.
यावर्षी हिवाळ्यामध्ये जर तुम्ही माथेरानला जाण्याची तयारी करत असाल, तर त्यासाठी तुम्ही नेरूळ या स्थानकावर उतरून टॉय ट्रेनने प्रवास करू शकता. तुम्ही तुमच्या परिवारासोबत तसेच मित्रांसोबत देखील जाऊ शकता. पुण्यात आणि मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी एक दोन दिवसाची ट्रिप करायची असेल, तर माथेरान हे अत्यंत चांगले असे स्थळ आहे.