सुशांत सिंह प्रकरणाच्या तपासात सर्वोच्च न्यायालयाही दोष आढळला नाही- गृहमंत्री अनिल देशमुख

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । सर्वोच्च न्यायालयाने सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर आता राज्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. आपण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करत असून सीबीआयला राज्य सरकार पूर्ण सहकार्य करणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

याशिवाय संपूर्ण तपासात मुंबई पोलिसांनी अत्यंत चांगली कामगिरी केली असून सर्वोच्च न्यायालयानेही तपासात दोष आढळला नसल्याचं म्हटलं आहे. मुंबई पोलिसांसाठी ही अभिमानाची बाब आहे असं अनिल देशमुखांनी सांगितलं.

“या सर्व प्रकरणी विरोधी पक्षातील नेते राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. बिहारमध्ये लवकरच निवडणुका पार पडणार आहेत आणि त्या लक्षात ठेवून काही नेते राजकारण करत आहेत. पण सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांनी योग्य तपास केल्याचं सांगितलं असून ते जास्त महत्त्वाचं आहे,” असं अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, राज्य सरकार न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देणं त्यांनी टाळलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment