Maharashtra Honeymoon Destinations : लग्नाची घाईगडबड संपली की प्रत्येक नवविवाहित जोडप्याला हनिमूनसाठी कुठे जायचं ? हा प्रश्न असतो. “हनीमूनसाठी कुठे जायचं?” काहींना थंडी हवी असते, काहींना समुद्रकिनाऱ्यावर शांत वेळ. पण हल्लीच्या काळात प्रवास करताना सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची झाली आहे. काश्मीरसारख्या पारंपरिक ठिकाणी असुरक्षिततेची छाया पडल्याने पर्यटक आता नवीन, सुंदर आणि सुरक्षित पर्याय शोधू (Maharashtra Honeymoon Destinations) लागले आहेत.
याच शोधात आता महाराष्ट्रातील काही नैसर्गिक, सौंदर्यपूर्ण आणि प्रेमभावना जागवणारी ठिकाणं पर्यटकांच्या पसंतीस उतरू लागली आहेत. खास नवविवाहितांसाठी, कमी खर्चात, अधिक अनुभव देणाऱ्या या डेस्टिनेशन्सबद्दल जाणून घेऊया… कारण हा प्रवास फक्त प्रवास नसतो… तो आठवण बनतो!
महाराष्ट्रातील टॉप हनीमून स्पॉट्स (Maharashtra Honeymoon Destinations)
महाबळेश्वर
हनीमून डेस्टिनेशन म्हटलं की महाबळेश्वर हे नाव सर्वात आधी घेतलं जातं. स्ट्रॉबेरीचे मळे, पॉईंट्सवरून दिसणारे नजारे आणि सुंदर हवामान… हे ठिकाण प्रेमी युगलांसाठी परफेक्ट आहे.
लोणावळा-खंडाळा
मुंबई आणि पुणे शहरांपासून जवळ असलेली ही ठिकाणं निसर्गाच्या सानिध्यात एकांत आणि शांतता देतात. येथे रिसॉर्ट्स, व्हिला आणि प्रायव्हेट पूल व्हिला सहज मिळतात. जोडीदारासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करण्यासाठी योग्य.
माथेरान
माथेरान हे वाहनमुक्त पर्यटनस्थळ आहे. शांत, स्वच्छ आणि निसर्गरम्य असलेल्या माथेरानमध्ये तुम्ही अगदी वीकेंड हनीमूनसाठीसुद्धा जाऊ शकता.
अलिबाग
मुंबईपासून फेरीने सहज पोहोचता येणाऱ्या अलिबागमध्ये कमी बजेटमध्ये बीच व्ह्यूसह हनीमून प्लॅन करता येतो. येथे सी फूड, वॉटर स्पोर्ट्स आणि रिसॉर्ट्सची भरपूर पर्याय आहेत.
मालवण
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण हे हनीमूनसाठी परफेक्ट ठिकाण आहे. सुंदर समुद्रकिनारे, किल्ले आणि वॉटर अॅक्टिव्हिटीजमुळे हे ठिकाण प्रेमी जोडप्यांना आकर्षित करतंय.
रत्नागिरी
शांत किनारे, समुद्राचा दरवळ, स्वच्छता आणि निसर्ग… हे सगळं रत्नागिरी जिल्ह्यात तुम्हाला मिळतं. गणपतीपुळे, दापोली, हरिहरेश्वर ही ठिकाणं रोमँटिक पर्यटनासाठी उत्तम पर्याय आहेत.
फायदे
- कमी बजेटमध्ये उत्तम अनुभव
- प्रवासात सुरक्षितता आणि सहजता
- निसर्गसौंदर्य, बीचेस, हिल स्टेशन, रिसॉर्ट्सचा मिलाफ
- महाराष्ट्रात असल्यामुळे भाषा, अन्न, संस्कृतीची ओळख
हनीमून म्हणजे आयुष्यातील अविस्मरणीय आठवणी. त्या तयार करताना ठिकाणही खास असावं लागतं. आज जेव्हा काश्मीरसारख्या पारंपरिक डेस्टिनेशन्सला पर्यटक टाळू लागले आहेत, तेव्हा महाराष्ट्रातली ही ठिकाणं एक स्वस्त, सुरक्षित आणि सुंदर पर्याय ठरत आहेत.




