कोयना धरणाचे पाणी कर्नाटकला देऊ नका, शिवसेना आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी , 

मुख्यमंत्री फडणवीस व जलसंपदा मंत्री महाजन यांना दिलेल्या लेखी पत्रामध्ये आमदार देसाई यांनी कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयामध्ये आज एकूण 34.89 टीएमसी इतका पाणी साठा आहे. त्यातील 17.64 टीएमसी इतके पाणी वीज निर्मितीस राखीव आहे. उर्वरीत 17.00 टीएमसी मधील अंदाजे 6.00 टीएमसी पाणीसाठा मृत साठा आहे. त्यामुळे केवळ दहा टीएमसी पाणीसाठा उपयुक्त आहे. तो गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा अंदाजे दहा टीएमसीने कमी आहे. कोयना धरणातील उपलब्ध पाणीसाठयाची स्थिती आहे.maharashtra karnataka water dispute

कर्नाटकच्या मागणीनुसार त्यांना यावर्षीच्या हंगामामध्ये आवश्यक पाणी यापुर्वीच देण्यात आले आहे. यंदाचा पावसाळा सुरु होण्याकरीता सव्वा महिना अवकाश आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा पावसाळयापर्यंत पुरण्याबाबतच सर्वांनाच साशंकता आहे. कोयना धरण पाटण तालुक्यात असले तरी पाटण तालुक्यातही यंदाच्या वर्षी पाणी टंचाईंने तीव्र स्वरुप धारण केले आहे. धरणामध्ये शिल्लक पाणी साठा कमी असल्याने उपलब्ध असणारा पाणी साठा राखून ठेवण्यासाठी पाटबंधारे विभागाला कसरत करावी लागत आहे. अशा टंचाईच्या काळात शेतीसाठी वापरात येणाऱ्या पाण्यावर व पिण्याच्या पाण्यावर निर्बंध आहेत. त्या सगळ्याचा गांभीर्याने विचार करुन कर्नाटकास कोयना धरणातून यापुर्वी सोडण्यात आलेल्या पाण्या व्यतिरिक्त ज्यादा पाणी सोडू नये, तसा संबधितांना आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे

Leave a Comment